Vitamin B12 Deficiency Symptoms google
लाईफस्टाईल

हाता-पायाला सतत मुंग्या येतात? असू शकते 'या' Vitamin कमतरता, आताच करा आहारात 'हा' बदल

Vitamin B12 Deficiency Symptoms: हातापायांना मुंग्या, सांधे दुखी आणि थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. तरुणांमध्ये वाढणारी व्हिटॅमिन B12 कमतरता गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

व्हिटॅमिन हे प्रत्येकाच्या शरीराठी खूप महत्वाचे असते. जर का याचं प्रमाण कमी झालं तर अनेक सामान्य वाटणाऱ्या पण कायम राहणाऱ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रौढांमध्ये म्हणजे १८ वर्षापासून ते ६५ वर्षांमधील व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. याचे कारण म्हणजे सगळ्यांचा बदललेला आहार.

व्हिटॅमिन B12 हे मासांहारी पदार्थांमध्ये असतं. जसे की, मासे, मांस, अंडी आणि दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ हे त्याचे मुख्य स्त्रोत आहेत. हे पदार्थ तुमच्या शरीरातील प्रथिनांच्या मदतीने लहान आतड्यात शोषले जातात. मग त्याचे रुपांतर लाल रक्तपेशींमध्ये होते. जर तुम्ही कॅल्शियमच्या कमतरतेवर उपचार केला नाही तर तुम्हाला भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल.

व्हिटॅमिन १२ च्या कमतरतेमुळे हातापायांत मुंग्या येतात, सुन्नपणा जाणवतो, अपचनाच्या समस्या निर्माण होतात, स्नायू कमकूवत होतात. तसेच मेंदूचे आकुंचन होण्याची शक्यता वाढते, त्याने गोष्टी धड लक्षात राहत नाहीत, विचार करण्याची क्षमता खुटंते आणि डिमेन्शियासारख्या, अल्झायमरसारख्या धोक्यांना सामोरे जावे लागते.

व्हिटॅमिन B12 ची कमतरता फक्त आहारामुळेच होते असे नाही तर काही आजारांमुळेही होते. जसे की, क्रोन्स डिसीज, सिलिएक आजार, अ‍ॅट्रोफिक गॅस्ट्रायटिस यांसारख्या पचनसंस्था मंदावण्याच्या समस्या. त्यात तुम्ही अ‍ॅन्टॅसिड्स, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स किंवा डायबेटीजसाठी वापरले जाणारे मेटफॉर्मिनसारखे औषध घेतल्यासही व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच शुद्ध शाकाहारी किंवा व्हेगन आहार घेणाऱ्या प्रौढांमध्ये या कमतरतेचा धोका जास्त असतो.

व्हिटॅमिन B12 ची कमतरता ओळखणे अनेकदा कठीण जाते, कारण त्याची लक्षणे इतर आजारांसारखी भासू शकतात. स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे, नैराश्य, मूड स्विंग्स आणि चिडचिड ही मानसिक लक्षणेही दिसू शकतात. जिभेवर सूज येणे, तोंडात जखमा होणे, त्वचा फिकट दिसणे, तसेच हृदयाचे ठोके वाढणे आणि दम लागणे हीही B12 कमतरतेची चिन्हे ठरू शकतात. त्यामुळे आहारात अंडी, दूध, दही आणि चीजसारखे दुग्धजन्य पदार्थही चांगले स्रोत आहेत. शाकाहारी आणि व्हेगन व्यक्तींनी फोर्टिफाईड प्लांट-बेस्ड दूध, ब्रेकफास्ट सिरीअल्स आणि न्यूट्रिशनल यीस्टचा समावेश आहारात करावा.

Accident : नंदुरबारमध्ये आयशर टेम्पो आणि ट्रकची भीषण धडक, रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या जखमींना देवदूतचा हात

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे २७०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती स्पेशल तीळ बाजरीची भाकरी बनवा, वाचा सोपी पद्धत

Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT