Nashik to Ayodhya Flight, Nashik to Ayodhya Flight Date Saam Tv
लाईफस्टाईल

Nashik to Ayodhya Flight : गुड न्यूज! नाशिक-अयोध्या प्रवास होणार सुखकर, लवकरच होणार विमानसेवा सुरु; तिकीट दर किती?

Nashik to Ayodhya Flight Date : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकहून अयोध्येला प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अयोध्येचा प्रवास सुखकर होणार आहे. त्यामुळे श्रीरामाचे दर्शन अवघ्या काही तासांमध्ये होईल.

कोमल दामुद्रे

Nashik to Ayodhya Flight Price :

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकहून अयोध्येला प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अयोध्येचा प्रवास सुखकर होणार आहे. त्यामुळे श्रीरामाचे दर्शन अवघ्या काही तासांमध्ये होईल.

२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिराचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यादिवशी भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठपना करण्यात आली. जाणून घेऊया नाशिकवरुन (Nashik) अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा कधी सुरु होणार आहे.

३१ मार्चपासून नाशिकहून नाशिक-लखनौ विमानसेवा (Flight) सुरु होणार आहे. या विमानसेवेमुळे भक्तांना अवघ्या ५ ते ६ तासांत अयोध्येला (Ayodhya) पोहोचता येणार आहे. सध्या रेल्वेने अयोध्येला जाण्यासाठी साधरणत: २४ ते ३० तासांचे अंतर कापावे लागते. पण विमानसेवेमुळे भाविकांचे दर्शनही लवकर होईल तसेच वेळही वाचेल.

1. तिकीट खर्च किती असेल?

Makemytrip च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार Indigo Flight ही आठवड्यातून चार वेळेस नाशिक ते लखनौची सुविधा देईल. या फ्लाइटचे तिकीट साधरणत: ६ हजार रुपये इतके असणार आहे. तर या किंमतींमध्ये वेळेनुसार बदलही होतील.

2. लखनौहून अयोध्येला कसे जाल?

लखनौहून अयोध्येला जाण्यासाठी कॅबने तुम्हाला साधरणत: २ ते ३ तासांचे अंतर कापावे लागेल. या ठिकाणाहून ट्रेनसुद्धा जाते. लखनौहून अयोध्येला ट्रेन मार्गेही जाऊ शकता. ट्रेन साधरणत: अयोध्येला पोहोचवण्यासाठी ४ तास घेईल. जर तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तिकीटासाठी किमान २०० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT