Meditation Canva
लाईफस्टाईल

Vipassana Meditation Benefits: विपश्यना का केली जाते? काय आहेत त्याचे फायदे, जाणून घ्या

Meditation benefits in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवशैलीमुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो. मानसिक स्वास्थ निरोगी ठेवण्यास ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया विपश्यना ध्यान करण्याचे फायदे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौतम बुद्धांनी विपश्यना विद्या देउन या विश्वावर अनेक उपकार केलेत. शतकांपुर्वी भारतातून हद्दपार झालेली ही विद्या आचार्य गोएंका यांनी पुन्हा भारतात आणली. आज हीच विद्या लाखो साधकांना विनामूल्य शिकवली जाते. अखेर असे काय या दहा दिवसांच्या कोर्समधे शिकवले जाते. या लेखात विपश्यनेचे थोडक्यात स्वरूप आणि तीचे फायदे सांगणार आहे.

कोणत्याही नव्या साधकासाठी विपश्यनेचा पहिला कोर्स १० दिवसांचा असतो. या १० दिवसांत कसे वागावे, काय करावे याचे काही नियम ठरलेले असतात. या दहा दिवसांत कुणाशीही कोणत्याही प्रकारे संपर्क करायचा नसतो. एकमेकांकडे पहावयाचेही नसते आणि काही वाचावयाचेही नसते. पहिल्या दिवशीच साधकांकडील सर्व वाचन व लेखनाचे साहित्य ताब्यात घेतले जाते. भ्रमणध्वनीसुद्धा जवळ ठेवण्यास परवानगी नसते. पहाटे ४ वाजता उठून २ तास ध्यान त्यानंतर ६.३० ते ७.३० ब्रेक त्यात प्रातर्विधी आणि आवरून नाश्ता करून पुन्हा ८ ते ११ ध्यान. जेवणानंतर १ तास विश्रांती झाली की पुन्हा ४ तास सलग ध्यान. आणि मग संध्याकाळी ५ वाजता चहा आणि चिवडा तो शेवटचा (तोही पहिल्यांदा विपश्यना करणार्यांना, ईतरांनी दुपारच्या जेवणानंतर थेट सकाळच्या नाश्त्यापर्यंत काहीही खावयाचे नाही) ६ ते ९ पुन्हा ध्यान आणि गुरुजींचे त्यांच्याच आवाजातील व्हिडीओ रेकॉर्डिंग ऐकले की तुमच्या एकांत निवसात जाऊन तुम्ही झोपायचे. हा एकच दिमक्रम रोज फॉलो करायचा.

विपश्यना म्हणजे काय ?

'देह देवाचे मंदिर' वगैरे अभंग तुम्ही ऐकले असाल तर त्या साऱ्या संतांनी विपश्यना च सांगितली आहे. आपल्या शरीराचा अभ्यास करावा आणि जमेल तेवढा मनाचा अभ्यास करावा. म्हणजे काय तर शरीराला आणि मनाला होणाऱ्या लहान सहान जाणिवा जाणवत रहावं आणि त्यांच्याकडे तटस्थतेने पाहावं. त्यावर प्रतिक्रिया देऊ नये. कोणत्याही जाणिवेविषयी राग लोभ वाटू देऊ नये. शरीराला जाणवणाऱ्या जाणिवा म्हणजे खाज येणं, घाम येणं, शहारे येणं, या स्थूल जाणिवा आहेत, सूक्ष्म जाणिवा शब्दात सांगता येणार नाहीत. त्या तुम्हाला अनुभव घेऊनच समजतील.

भीती वाटणं, राग, चीड, गरज, आठवण येणं, ओढ वाटणं या साऱ्या मनाला होणाऱ्या जाणिवा त्याबाबतीत सुद्धा तसेच निर्विकार राहून प्रतिक्रिया न देणं म्हणजे विपश्यना. एखादी गोष्टीची जाणीव होणं महत्वाचं त्यातून मिळणारा बोध म्हणजे बुद्धी. आपल्या शरीरापासून सुरुवात करून विश्वाच्या जाणिवा ज्याला झाल्या तो बुद्ध झाला, असे अनेक बुद्ध होऊन गेले, होतील, आहेत त्यातल्या एकाने ही विद्या पुन्हा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्या बुद्धाला आपण गौतम बुद्ध म्हणून ओळखतो.

विपश्यनेचे फायदे काय

विपश्यना केल्याचे फायदे हे व्यक्तिशः वेगवेगळे आहेत. तसेच तुम्ही त्या मार्गात किती पुढे जाता आणि त्यावर किती वेळ देता यावर तुम्हाला मिळणारा फायदा किंवा अनुभव अवलंबून असतो. शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारते, सकारात्मक दृष्टी लाभते. स्वताला तुम्ही कळत जाता. जाणीवा प्रगल्भ होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT