Vegetables Rate Hike Saam TV
लाईफस्टाईल

Vegetables Rate Hike : पितृपक्ष सुरु होताच भाज्या महागल्या; सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री

Vegetables Price Double Increase : पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागलीये. आवक घटली असताना मागणी वाढल्याने हा परिणाम झाला आहे.

Ruchika Jadhav

पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झालीये. त्यामुळे आवक घटली असताना आठवडेबाजारात तरकारी मालासह भाजीपाल्याचा भाव चांगलाच वाढला आहे.

गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी आख्यायीकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच. मात्र यंदा पावसाच्या अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेय.

विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टीने आणि तिप्पटीने वाढून गगणालाच भिडले आहेत. यात भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीर आणि मेथीही महागली आहे.

किलोमध्ये भाव

वांगी - ८० ते १०० रुपये

टोमॅटो - ८० ते १०० रुपये

भेंडी - ८० ते १०० रुपये

बटाटा - ८० ते १०० रुपये

कांदा - ८० ते १०० रुपये

फरसबी - ८० ते १०० रुपये

टोमॅटो - ८० ते १०० रुपये

भाजीपाल्याच्या दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. आता पितृपक्षात तर भाववाढीचा आलेख चढतच राहील. त्यामुळे नागरिकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. आधीच राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. महागाई जास्त वाढल्याने सामान्य नागरिकांना विविध गोष्टी खरेदी करताना दररोज जास्तीचा खर्च करावा लागतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT