Veg Thali Cost Increase Saam Tv
लाईफस्टाईल

Veg Thali Price Increase: नॉन व्हेजपेक्षा व्हेज थाळी झाली महाग! भाज्यांच्या वाढत्या दरामुळे नागरिकांच्या खिशाला फटका

Veg Thali Cost More Than Non-Veg Thali: सध्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाज्यांच्या किंमती महाग झाल्या आहेत. त्यामुळेच व्हेज थाळीच्या किंमती वाढल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकजण बाहेर जेवताना थाळीला प्राधान्य देतात. ऑफिसचे लोक कधी बाहेर जेवायचे म्हटले तर एक थाळी घेतात. या थाळीत अनेक पदार्थ असतात. त्याचसोबत एका थाळीत पोट पूर्ण भरते. त्याचसोबत अगदी घरचे जेवण जेवल्यासारखे वाटते. परंतु आता हीच थाळी महाग झाली आहे. आता शाकाहारी थाळीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शाकाहारी लोकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे. सरासरी शाकाहारी थाळीच्या किंमतीत ९ टक्क्याने वाढ झाली आहे.

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात, कांदा, टॉमेटो तसेच जीवनावश्यक पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे शाकाहारी थाळी महाग झाल्याचे म्हटले आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनेलिसिसच्या अहवालात शाकाहारी थाळी महाग झाल्याचे सांगली आहे. तर दुसरीकडे ब्रॉयलर चिकनच्या दरात घसरण झाल्याने नॉन थाळीच्या किंमती कमी झाल्या आहेत.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात शाकाहारी खाद्यपदार्थांची किंमत २७.८ रुपये प्रति थाळी झाली आहे. हीच किंमत एका वर्षांपूर्वी २५.५ रुपये होती. या थाळीत भाजी चपातीचा समावेश असतो. त्यासाठी कांदा, टॉमेटो, बटाटा, तांदूळ, डाळ, दही, कोशिंबीर असते. याच गोष्टींच्या किंमती वाढल्याने थाळीची किंमत वाढली आहे.

टॉमेटोच्या किंमती ३९ टक्क्यांने वाढ झाली आहे तर बटाट्याच्या किमतीत ४१ टक्के आणि कांद्याच्या किंमतीत ४३ टक्के वाढ जाली आहे. याचाच परिणाम शाकाहारी थाळीच्या किंमतीवर झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

तांदूळ डाळींच्या किंमतीतही वाढ झाली आहे. तांदूळ १३ टक्के तर डाळ २१ टक्क्यांनी महाग झाली आहे. तसेच खाद्य तेलांच्या किंमतीतदेखील वाढ जाली आहे. त्यामुळे शाकाहारी थाळी खाणाऱ्या लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT