Onion Seeds: कांदा बियाणे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर; दरात दीड हजार रुपयांपर्यंत वाढ

Nashik Onion Farmer News: कांदा उत्पादक शेतकरी बियाणे खरेदी करून पावसाळ्यात वाफा तयार करत त्यात बियाणे टाकून रोप तयार करत असतो.
Onion Seeds: कांदा बियाणे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर; दरात दीड हजार रुपयांपर्यंत वाढ
Onion SeedsSaam TV

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कांदा रोप तयार करण्यासाठी विविध कंपन्यांचे बियाणे सध्या कृषी दुकानात उपलब्ध झालेले असले, तरी काही ठराविक कंपन्यांच्या कांदा बियाण्यांच्या पाकीटमध्ये तब्बल १००० ते १५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे हे बियाणे घेणे आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. 

Onion Seeds: कांदा बियाणे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर; दरात दीड हजार रुपयांपर्यंत वाढ
Akola Accident : ट्रक- दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू; ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली

कांदा (Onion) उत्पादक शेतकरी बियाणे खरेदी करून पावसाळ्यात वाफा तयार करत त्यात बियाणे टाकून रोप तयार करत असतो. यामुळे मार्केटमध्ये बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. मात्र या बियाणाच्या दारात वाढ झाली असून, सध्या त्याचे दर १७०० ते २१५० रुपयांवर जाऊन पोहचले आहे. तर याच बियाण्यांचे पाकीट मागिल वर्षी १४०० रुपयांना विकले (Nashik) जात होते. 

Onion Seeds: कांदा बियाणे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर; दरात दीड हजार रुपयांपर्यंत वाढ
Kalyan News : आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने चोरी; लोकलमधून मोबाईल व चैन लांबवताच सापडला पोलिसांच्या ताब्यात

दुष्काळी परिस्थितीने बियाणे तयार करण्यास अडचण 

अनेक वेळेस कंपन्यांचे बियाणे निकृष्ठ ठरत असल्याने शेतकरी स्वतः डेंगळे लावून बियाण घरीच तयार करीत असतात. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे (Farmer) शेतकऱ्यांना बियाणे तयार करता आले नसल्याने खरीप हंगामाच्या कांदा लागवडीसाठी कंपन्याचे चढ्या दरात बियाण खरेदीची वेळ आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com