Attached Bathroom And Toilet Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Combined Toilet and Bathroom Vastu Tips for Home: घरामध्ये टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असावे की नाही? वास्तुशास्त्राचे नियम काय सांगतात?

Attached Bathroom And Toilet Vastu Tips: घरामध्ये टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असावे की नाही? वास्तुशास्त्राचे नियम, वास्तुदोषाचे परिणाम, योग्य दिशा जाणून घ्या.

Manasvi Choudhary

Combined Toilet and Bathroom Vastu Tips for Home:

आजकाल अनेक घरामध्ये बाथरूम आणि टॉयलेट एकत्र असतात. जागेच्या कमतरतेमुळे अनेकजण बाथरूम आणि टॉयलेट एकत्र बांधतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार, घरातील टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असणे चुकीचे मानले जाते. घरात एकत्र टॉयलेट आणि बाथरूम एकत्र बांधल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

घरात टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मनावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये चंद्राचा वास असतो, तर शौचालयात राहूचा वास असतो असे मानले जाते. जर टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असतील, तर चंद्र आणि राहू एकत्र आल्याने चंद्र दोषपूर्ण होतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या मनावर व आरोग्यावर होऊ लागतो.

टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असल्याने कोणते वास्तुदोष होतात?

  • जर घरात एकत्र टॉयलेट आणि बाथरूम असल्यास घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद-मतभेद होऊ शकतात.

  • पती- पत्नी यांच्यामधील वाद वाढतात. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

  • घरामध्ये एकत्र टॉयलेट आणि बाथरूम असेल तर नकारात्मकता ऊर्जा वाढण्याची शक्यता वाढू शकते.

  • कुटुंबातील सदस्याचे प्रगतीचे मार्ग बंद होतात. आर्थिक कमतरता भासू लागते.

  • घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडते.

घरामध्ये कोणत्या दिशेला बाथरूम असावे?

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये पूर्व दिशेला बाथरूम बांधणे शुभ मानले जाते. तर टॉयलेट दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असावे. दक्षिण आणि नैऋत्य दिशा विसर्जनासाठी योग्य मानली जाते.

सोपा उपाय काय?

जर तुमच्या घरामध्ये आधीपासूनच टॉयलेट आणि बाथरूम जोडलेले असतील, तर ते पाडून पुन्हा बांधणे कठीण आणि खर्चिक ठरू शकते. अशा वेळी वास्तुदोष कमी करण्यासाठी तुम्ही टॉयलेट आणि बाथरूमच्या मधोमध एक पडदा लावू शकता. पडद्यामुळे दोन्ही जागांचे विभाजन होते आणि वास्तुदोष टाळण्यास मोठी मदत होते.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Maharashtra News Live Update: ICC च्या अध्यक्षपदी पुन्हा जय शाह यांची वर्णी

Ration Card Update : रेशनकार्ड विभक्त केल्यावर धान्य बंद झालं, पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावं? वाचा नवीन नियम

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले, १० तोळा ८,२०० रुपयांनी स्वस्त; १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

भाजप राष्ट्रवादीचे विलिनीकरण कधीच होऊ देणार नाही, बड्या नेत्याचा दावा; सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंचा दिला संदर्भ

Sandalwood Water Bath Benefits : चंदनाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे 5 चमत्कारिक फायदे, त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT