Manasvi Choudhary
सौंदर्यशास्त्रामध्ये, चंदनाला विशेष महत्व आहे. फार पूर्वीपासून त्वचेचे सौंदर्यासाठी चंदनाचा वापर केला जात आहे.
तुम्हीही अंघोळीच्या पाण्यामध्ये चंदनाची पावडर मिसळून स्नान केले तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील.
चंदनाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे शरीराला कोणते फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
चंदनाच्या पावडरमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील जळजळ कमी होते आणि त्वचा आतून स्वच्छ होऊन उजळण्यास मदत होते.
तुम्हाला जर चेहऱ्यावर किंवा पाठीवर मुरुमे येत असतील तर चंदनाच्या पाण्याने अंघोळ करणे अत्यंत फायदेशीर आहे.
घामामुळे अंगाला दुर्गंधी येते. अंघोळीच्या पाण्यात चंदन मिसळल्याने त्वचा स्वच्छ होते, बॅक्टेरिया नष्ट होतात आणि शरीर दिवसभर फ्रेश राहते.
चंदनाचा सुवासाने मनाला शांती मिळते. चंदनाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे केवळ शारीरिक स्वच्छताच नाही, तर त्याच्या सुवासामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन मनाला शांती मिळते.
एका बादलीमध्ये कोमट पाण्यात १ ते २ चमचे चंदनाची पावडर टाका.
पाण्यात चंदनाची पावडर व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये तुम्ही गुलाबजल देखील मिक्स करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.