Holi Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Chapati Vastu Tips: चपात्या मोजून बनवता? वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात येऊ शकते नकारात्मक ऊर्जा

Kitchen Vastu Rules: चपात्या मोजून बनवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि परंपरेनुसार स्वयंपाकघरातील महत्त्वाचे नियम काय आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. एकेकाळी मोठ्या कुटुंबांची परंपरा असलेला समाज आता हळूहळू लहान, न्यूक्लियर कुटुंबांकडे वळताना दिसतोय. घरातील सदस्य कमी झाल्यामुळे स्वयंपाकही मर्यादित प्रमाणात केला जातो. गॅस, इलेक्ट्रिक चूल यामुळे पटकन जेवण तयार करण्याची सवय लागलीये. पण या सगळ्यात एक साधा वाटणारा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे, चपात्या मोजून बनवणं योग्य आहे का?

चपात्या मोजून बनवणं योग्य की अयोग्य?

वास्तुशास्त्रानुसार, चपात्या मोजून बनवणं टाळावं असं सांगितलं जातं. असा समज आहे की, चपात्या मोजल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर गहू हा सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्य म्हणजे ऊर्जा आणि तेजाचं प्रतीक. त्यामुळे चपात्या मोजणं म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान मानला जातो आणि त्यामुळे सूर्याची कृपा कमी होऊ शकते, अशी समजूत आहे.

पोळपाट-लाटण्याच्या आवाजाकडेही लक्ष द्या

स्वयंपाकघराला घरातील सर्वात पवित्र जागा मानलं जातं. त्यामुळे चपाती बनवताना पोळपाट लाटण्याचा जास्त आवाज होणं अशुभ मानलं जातं. असा आवाज घरात तणाव किंवा वाद निर्माण होण्याचं संकेत मानला जातो. जर याचा जोरात आवाज होत तर त्याखाली कापड ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

शिळं पीठ वापरणं टाळा

आजकाल वेळ वाचवण्यासाठी अनेकजण पीठ आधीच मळून फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र वास्तुशास्त्रात हे चुकीचं मानलं गेलंय. रात्री किंवा काही दिवस अगोदर मळून ठेवलेल्या पिठाला नकारात्मकतेशी जोडलं जातं. ताज्या पिठापासून बनवलेल्या चपात्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात.

गरम तव्यावर पाणी टाकणंही अशुभ

चपाती बनवून झाल्यानंतर लगेच गरम तव्यावर पाणी टाकण्याची सवय काही घरांमध्ये असते. पण वास्तुनुसार हे टाळावं. असं केल्याने घरात तणाव किंवा अडचणी वाढण्याची शक्यता अधिक असते.

पहिली आणि शेवटची चपाती खास का?

भारतीय परंपरेत पहिली चपाती गायीला देण्याची पद्धत आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. धार्मिक मान्यतेनुसार, गायीला पहिली चपाती दिल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे शेवटची रोटी कुत्र्याला देण्याचीही परंपरा आहे. यामुळे संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा घरी येते असं म्हणतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने विकणाऱ्या फस्ट कॉफी शूज वर पोलिसांची धाड

Viral Video: वय १०३ वर्ष पण अंगी जिद्द आणि चिकाटी; आजींचा चहाच्या टपरीवरील संघर्ष पाहून युजर्स भावूक

Designer Saree Type: यंदाच्या लग्नसराईसाठी ट्राय करा या ७ ट्रेंडी युनिक पण अंगाला न चरचरणारी डिझायनर साडी

दररोज वापरण्यासाठी परफेक्ट आहेत चार्म ब्लॅक बीड्स पैंजण; पहा खास डिझाइन्स

Ratnagiri Travel : कडाक्याच्या उन्हात अनुभवा थंडगार हवा, रत्नागिरीतील 'या' धबधब्याची पर्यटकांना भुरळ

SCROLL FOR NEXT