वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. घरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग स्वयंपाकघर. वास्तुशास्त्रानुसार स्वंयपाकघराची दिशा ठरवली जाते.
स्वयंपाकघरात काही गोष्टी ठेवल्यास सकारात्मक आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. घरातील वास्तू बिघडली तर नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. ज्याचा परिणाम आयुष्यावर होतो. स्वयंपाकघराशी संबंधित असे अनेक वास्तू नियमही सांगितले आहेत ज्याचे पालन केल्याने वास्तूदोष टाळता येऊ शकतो. जर तुमच्या स्वयंपाकघरात या गोष्टी असतील या गोष्टी आज फेकून द्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. किचन वास्तु टीप्स
काही लोकांना किचनमध्ये औषध (Medicine) ठेवण्याची सवय असते. स्वयंपाकघरात औषध ठेवल्याने घरातील सदस्यांवर, आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्वयंपाकघरात औषधे ठेवू नका.
स्वयंपाकघरात सतत धुळ असणे देखील वाईट असते. यामुळे सतत नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. तसेच रात्रीच्या वेळी उष्टी भांडी कधीही सोडू नका. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. आर्थिक (Money) स्थिती बिघडू शकते.
मळलेले पीठ जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नका. फ्रीजमध्ये किंवा किचनमध्ये जास्त वेळ पीठ ठेवल्यास राहू-शनिचा वाईट परिणाम होतो. नकारात्मक ऊर्जा देखील वाढते.
घराच्या किचनमध्ये तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी ठेवू नका. यामुळे तुमच्या नशिबावर परिणाम होतो. सुरु असलेली कामे देखील बिघडतात. आर्थिक नुकसान देखील होते.
स्वयंपाकघरात आरसा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते. त्यामुळे स्वयंपाकघरात आरसा लावू नका. घरातील सुख-शांती हिरावली जाते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.