Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : सायंकाळच्या वेळी या वस्तू चुकूनही कुणाला देऊ नका, सापडाल आर्थिक संकटात

Avoid this things donate in Evening Time : वास्तूशास्त्रानुसार आपली एक छोटी चूक सगळ्यात जास्त महागात पडू शकते. वास्तूनुसार दिशांचे महत्त्व सांगितले जाते. घरातील प्रत्येक दिशा ही सकारात्मक असते. काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या शुभ परिणाम मिळतात.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

वास्तूशास्त्रानुसार आपली एक छोटी चूक सगळ्यात जास्त महागात पडू शकते. वास्तूनुसार (Vastu Tips) दिशांचे महत्त्व सांगितले जाते. घरातील प्रत्येक दिशा ही सकारात्मक असते. काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या शुभ परिणाम मिळतात.

बरेचदा सायंकाळच्या वेळी आपण अशा चुका करतो ज्यामुळे आपल्यावर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्जातून (Loan) बाहेर पडणे कधीकधी खूप कठीण होते. काही लोक कर्जातून मुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. वास्तूसंबंधित कोणत्या चुका करतो. ज्यामुळे आर्थिक (Money) समस्यांना तोंड द्यावे लागते जाणून घेऊया त्याबद्दल

  • घराच्या मुख्य दरवाजावर कधीही कचरा पेटी ठेवू नका. असे केल्याने लक्ष्मी देवी रागावते. तसेच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.

  • अनेकदा लोक अंथरुणात असताना घाईघाईत जेवायला बसतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने गरीबीचा सामना करावा लागतो. सुख-समृद्धीच्या मार्गात अडचणी येतात.

  • रात्री किचनमध्ये उष्टी भांडी ठेवू नका. झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. काही कारणास्तव तुम्हाला रात्री भांडी साफ करताना येत नसतील तर ती स्वयंपाकघरात ठेवू नका. त्यामुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.

  • संध्याकाळी दूध, दही आणि मीठ दान करु नका. वास्तूशास्त्रानुसार असे केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

  • रात्री बाथरुममध्ये रिकामी बादली ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी बाथरुममध्ये भरलेली पाण्याची बादली ठेवा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT