Vastu Tips Improper footwear placement as per Vastu rules can disturb peace and harmony at home  saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: घरात भांडणं वारंवार होतात? वास्तूमधील 'या' ३ चुका चुकूनही करू नका

Vastu Tips: घरात सतत भांडणं होत असतील तर त्यामागे वास्तूमधील दोषाचे कारण असू शकते. हा दोष सोडवण्यासाठी कोणते विशेष उपाय सुचवले आहेत ते जाणून घेऊया.

Bharat Jadhav

  • चुकीच्या ठिकाणी ठेवलेले बूट-चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात

  • वास्तुशास्त्रात बूट-चप्पलच्या व्यवस्थेला महत्त्वाचं स्थान आहे

  • बूट-चप्पल वास्तु नियम पाळल्याने भांडणं आणि वाद कमी होतात

  • योग्य वास्तु पद्धतीने ठेवलेले बूट-चप्पल घरातील शांतता वाढवतात

आपण आपले घर सजवण्यासाठी पैसा खर्च करत असतो. घरातील फर्निचर, वनस्पती, पेंटिंग्ज आदी सजावटीच्या वस्तूंच्या मदतीने घर सजवत असतो. मोठा पैसा खर्च करूनही घरात नेहमी भांडणं होत असतात. घरात अशांतता कायम राहते. यामागे एक कारण वास्तुदोषाचा आहे. वास्तूदोषाचं कारण हे अगदी छोटे असते तरीही आपल्या जीवनात शांतता येत नाही. हे छोटं कारण म्हणजे बूट आणि चप्पलशी संबंधित वास्तु नियम. वास्तुशास्त्रात बूट आणि चप्पलशी संबंधित वास्तु नियमांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

वास्तुशास्त्रातील जाणकारांच्या मते, जर हे नियम योग्यरित्या पाळले गेले तर घरात होणारी भांडणं आणि वाद आपोआप संपतील. घरात आणि कुटुंबात आनंद, समृद्धी आणि कल्याणाचे वातावरण निर्माण होईल. वास्तुशास्त्रात काही ठिकाणे पवित्र मानली जातात, जिथे बूट आणि चप्पल घालून जाणे अशुभ आहे. या नियमांचे पालन केल्याने घरात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील पूजास्थान हे सर्वात पवित्र स्थान आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपले बूट आणि चप्पल काढतो, त्याचप्रमाणे आपण घरातील मंदिर किंवा देव्हाऱ्याजवळ बूट घालून जाऊ नये. जर बूट आणि चप्पल घालून जात असाल तर देवी-देवतांचा अपमान मानले जाते. त्यामुळे घराची शांती भंग होऊ शकते.

स्वयंपाकघरात पादत्राणे वापरू नका

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला पवित्र स्थान मानले जाते, कारण येथे आई अन्नपूर्णा राहते. वास्तुशास्त्रानुसार, बूट आणि चप्पल घालून स्वयंपाकघरात प्रवेश करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. वास्तुशास्त्रात तिजोरीला देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते.

तिजोरीजवळ बूट आणि चप्पल घालून जाणे म्हणजे पावित्र्याचे उल्लंघन करण्यासारखे असते. आर्थिक नुकसान आणि पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून वास्तु नियमांनुसार, बूट आणि चप्पल घालून कधीही तिजोरीजवळ जाऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद रोस्टरविरोधातली याचिका नागपूर खंडपीठानंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

SCROLL FOR NEXT