
शुक्र ग्रह १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
यामुळे पाच राशींना विशेष लाभ होणार आहे – संपत्ती, प्रेम, वाहन व गृहसंपत्ती प्राप्तीचा योग.
शुक्र प्रेम, सौंदर्य आणि भोग यांचा प्रमुख कारक ग्रह मानला जातो.
गोचराचा प्रभाव राशीच्या चंद्रावर आधारित असल्याने वैयक्तिक पत्रिकेची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरते.
वैदिक ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रह हा प्रेम, सौंदर्य, आनंद, समृद्धी आणि वैभवाचा प्रतीक मानला जातो. शुक्र २६ जुलै २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता. आता १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:१४ वाजता पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरू ग्रह पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी आहे. हे नक्षत्र नूतनीकरण, सर्जनशीलता आणि आध्यात्मिक विकासाचे प्रतीक आहे. मिथुन राशीवर बुध ग्रहाचे अधिपत्य आहे. हा ग्रह संवाद, बुद्धिमत्ता आणि सामाजिक भान राखणारा आहे. शुक्र आणि पुनर्वसु नक्षत्राचे हे संयोजन अनेक राशींसाठी फायद्याचे ठरणार आहे.
मिथुन राशीत शुक्र असल्याने व्यक्तीची संवाद शैली, बौद्धिक क्षमता आणि सामाजिक संबंध मजबूत होत असते. पुनर्वसु नक्षत्राला नवीन सुरुवात, सर्जनशीलता आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानले जाते. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे, या नक्षत्रात शुक्राची ऊर्जा सकारात्मकता आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे. हे संक्रमण म्हणजेच गोचर विशेषतः शुक्र आणि गुरु ग्रहाच्या उर्जेने प्रभावित असलेल्या राशींसाठी फायदेशीर ठरेल. प्रेम, करिअर, आर्थिक आणि सर्जनशील कार्यात प्रगतीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या गोचरचा फायदा कोणत्या राशींना होईल?
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या संक्रमणादरम्यान, शुक्र वृषभ राशीच्या जातकांच्या दुसऱ्या घरावर परिणाम करेल. पुनर्वसु नक्षत्र या घरात सकारात्मक बदल आणेल. यावेळी संपत्ती संचयित करण्याच्या संधी वाढतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. कुटुंबात आनंद, शांतीचे वातावरण असणार आहे. यासह प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणि विश्वास वाढेल. यामुळे नाते अधिक मजबूत होईल. पैशाची गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगली परतफेड मिळू शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी, शुक्राचे हे संक्रमण पहिल्या घरात होईल. हे घर जे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि आकर्षणाचे स्थान आहे. पुनर्वसु नक्षत्रात शुक्राचा प्रवेश या राशीसाठी नवीन ऊर्जा आणि संधी घेऊन येईल. या काळात तुमचे व्यक्तिमत्व आकर्षण बनेल. तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात लोक तुमच्या कामाने प्रभावित होतील. लेखन, डिजिटल मीडिया किंवा माध्यमांशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र राशीचे हे भ्रमण दहाव्या घरात होईल, जे करिअर, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक यशाचे घर आहे. पुनर्वसु नक्षत्राची ऊर्जा या प्रभावाला अधिक सकारात्मक बनवेल. या काळात कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नवीन प्रकल्प किंवा भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात स्थिरता आणि आनंद वाढेल.
तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या गोचरदरम्यान शुक्र नवव्या भावावर प्रभाव पाडेल. पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव तुमचे नशीब पालटणार ठरेल. या गोचरच्या काळात धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. तसेच परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित संधी मिळू शकतात.प्रेमसंबंधांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढेल, यामुळे नाते मजबूत होईल. त्यामुळे संबंध मजबूत करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसाय वाढेल आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र राशीचे हे संक्रमण पाचव्या भावावर परिणाम करणारे असेल. पुनर्वसु नक्षत्रातील गुरुची ऊर्जा सर्जनशीलता आणि प्रेम वाढवणारी असेल. या काळात तुम्हाला कला, डिझाइन किंवा लेखन यासारख्या सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले निकाल मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये रोमान्स आणि उत्साहाचे वातावरण असेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात.
टीप: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही याला दुजारा किंवा सहमत दर्शवत नाही.
शुक्र गोचर २०२५ कधी होत आहे?
१२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:१४ वाजता शुक्र ग्रह पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
शुक्र ग्रह कोणत्या गोष्टींचा कारक मानला जातो?
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, सुख, ऐश्वर्य आणि कला यांचा कारक आहे.
यावेळी कोणत्या राशींना शुभ फळे मिळतील?
या गोचरामुळे पाच राशींचे नशीब पालटणार असून त्यांना घर, पैसा, प्रेम आणि गाडी मिळण्याची शक्यता आहे.
शुक्र गोचरचे प्रभाव किती काळ टिकू शकतात?
गोचराचा प्रभाव पुढील काही आठवडे ते महिने राहू शकतो, हे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.