Panchang today in Marathi saam tv
लाईफस्टाईल

Todays Panchang: वसंत पंचमीला सरस्वती पूजेचा विशेष योग; शुभ मुहूर्त, राहुकाल आणि पंचांग पहा

Panchang Today 23 January 2026: आज वसंत पंचमीचा शुभ दिवस आहे. हा दिवस विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वती यांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानप्रेमींसाठी हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज २३ जानेवारी २०२६ रोजी वसंत पंचमी आहे. या दिवशी सरस्वती पूजेचं विशेष महत्त्व असतं. देवी सरस्वतीची वाणी, विद्या, ज्ञान, संगीत, कला आणि ज्ञानाची देवता म्हणून तिची पूजा करण्यात येते. श्री सरस्वती सिद्धी विद्या साधना करून साधकांना प्रवीणता आणि सखोल ज्ञान प्राप्त होतं.

याशिवाय आज शुक्ल पक्षातील पंचमी तिथी, पूर्व भाद्रपद नक्षत्र आणि परिघ योगाचा प्रभाव आज दिवसभर राहणारआहे. चंद्र मीन राशीत असल्यामुळे मन अधिक संवेदनशील राहू शकतं. तसंच आध्यात्मिक, कलात्मक कामांकडे तुमचा ओढ वाढू शकतो.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल पंचमी

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • वार: शुक्रवार

  • नक्षत्र: पूर्व भाद्रपद

  • योग: परिघ (दुपारी 03:47:35 पर्यंत)

  • करण: बव

  • चंद्र राशि: मीन

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:52:04 AM

  • सूर्यास्त: 05:40:15 PM

  • चंद्रोदय: 09:35:17 AM

  • चंद्रास्त: 10:00:14 PM

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): माघ

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त:

11:55:00 AM ते 12:37:00 PM

या वेळेत नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार किंवा धार्मिक कार्य करणं लाभदायक ठरणार आहे.

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 10:55:08 AM ते 12:16:09 PM

यमघंट काल: 02:58:12 PM ते 04:19:13 PM

गुलिकाल: 08:13:05 AM ते 09:34:06 AM

आज कोणत्या चार राशींना दिवस विशेष चांगला?

मीन रास

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. मन शांत राहील आणि निर्णय घेताना मन योग्य मार्ग दाखवेल.

कर्क रास

भावनिक स्थैर्य आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता असून घरगुती निर्णय योग्य ठरतील. मानसिक समाधान देणारा दिवस आहे.

वृश्चिक रास

कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित राहणार आहे. गुंतागुंतीची कामं सहज पूर्ण होऊ शकणार आहेत. आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल असून भविष्यासाठी ठोस निर्णय घेता येतील.

वृषभ रास

आज नातेसंबंधात गोडवा वाढणार आहे. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवण्याची शक्यता आहे. संयम आणि व्यवहारकुशलतेमुळे दिवस यशस्वी ठरणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ६० हजारांचा मोह, तो बुकिंग क्लर्क अन् अलगद जाळ्यात अडकला रेल्वेचा तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टर

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद, दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन

Amazon Layoffs: मोठी बातमी! अ‍ॅमेझॉनमध्ये सर्वात मोठी नोकरकपात, १४,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूशी हँडशेक, मिठीही मारली...; सामन्यानंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

BMC Mayor: ठाकरेंचा महापौर होणार? दिग्गज नेत्याची एक 'रिक्वेस्ट' अन् राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT