Valentine Day Marathi Love Letter:  saam tv
लाईफस्टाईल

Valentine Day Love Letter: 'स्वप्न राहील अपुरे तुजवीण सख्या रे'; मनातील तळमळ बोलू कशी?

Valentine Day Marathi Love Letter: आपल्या मनातील भावनांना पत्रातून व्यक्त करा. अनेकवेळा मनातील भाव आपल्या ओठांवर येत नाहीत. त्यामुळे पत्र लिहून भावनांना वाट मोकळी करून द्या.

Bharat Jadhav

प्रिय,...

गेल्या चार पाच दिवसापासून मनात काहूर माजू लागलंय. तुला कसं सांगावं आणि कसं मनातील भावना व्यक्त कराव्यात, हेच कळत नाहीये. व्हॉट्स अप मेसेज करून तुला सांगू शकले असते पण मला वाटतं त्या मेसेजपेक्षा पत्रातील शब्दांनी माझ्या भावना व्यक्त होतील. मी जास्त काही बोलत नाही थेट सांगते, मला तू आवडतोस.. खूप आवडतोस.. तुला पाहिलं नाही ना तर मनात तळमळ होते.

'होतोया कासावीस

तूच तू रात अन दिस

ओंजळीत सांग कसं

तुफान मावल

तुला पाहुन पाहुन याड लागलं'

तुला जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाहिलं तेव्हा पासूनच माझं हे मन तुझ्यात गुंतलंय. का कोणास ठाऊक मी आपोआप तुझ्याकडे ओढली जाते. तुला पाहण्यास मन माझं झुरतं. तू माझ्याशी अबोला नको पकडूस ना.. तुला माहितीये नकळतपणे मी तुझ्यात खूप गुंतलीय. एकेदिवशी तू माझा हात पकडला होतास तेव्हा अंगात वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण झाली होती. हृदयाची धकधक वाढली होती.

आर्त मी तुषार्त मी

तू मृगजळा सारखा

गीत मी संगीत मी

सूर तू रे पारखा

तुला सांगू तू जेव्हा चष्मा लावून येतोस ना तेव्हा काय क्लास दिसतोस तू. मागच्या आठवड्यातही तू चष्मा घालून आला होता त्यावेळी आमच्या घोळक्यात तुझीच चर्चा होती. तू खूप हुशार आहेस . प्रामाणिक आहेस. मला तू खूप आवडतोस. साधेपणा आणि स्वभाव चांगला असला की माणूस आपोआप आवडतो, असं म्हणतात. तुझ्याबाबतीही तेच झालंय. नेहमी मोबाईल मेसेज करण्याची सवय आहे. थोडक्यात काय ते बोलायचं ते बोलत असते. त्यामुळे पत्र लिहितांना शब्द मिळत नाहियेत. पण सांगू का राहुल मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू...

तुझीच मी...

संगिता

औरंगाबाद

मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहर शेख यांच्या विधानावरून भाजपमध्ये मतभेद; हिरव्या रंगावरून मंत्री गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य, VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील सिंहगड रोडवर वाहनावर झाड पडलं, रस्त्यावर झाली प्रचंड वाहतूक कोंडी

माजी आमदार आणि नगराध्यक्षाच्या घराबाहेर भानामती, ऐन ZP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

Vati Mangalsutra Designs: पारंपारिक वाटी मंगळसूत्राच्या हटके आणि स्टायलिश डिझाईन्स, हे आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स

Ahilyanagar Accident: ट्रकची धडक होताच दुचाकीवरील तरुण हवेत उडाला; खाली पडताच ट्रक अंगावरून गेला

SCROLL FOR NEXT