तुला कसं आणि कुठे माझ्या मनातील गोष्ट सांगावी तेच कळत नाहीये. आणि मनातील भावना तुला सांगितल्याशिवाय राहता येत नाही. मन, भावना, बेचैन ही शब्द आल्यानंतर तुला कळलेच असेल की, मी हे पत्र काय सांगण्यासाठी लिहित आहे. हो, अगदी बरोबर ओळखलंस. हो, मी तुझ्यावर प्रेम करतो. अगदी जीवापाड प्रेम करतो. तू जीवनात नसलीस तर मी जगू शकत नाही.
सोनी आय लव्ह यू...
हम तुम्हें इतना प्यार करेंगे
हम तुम्हें इतना प्यार करेंगे
कि लोग हमें याद करेंगे
तुला प्रपोज पत्रातून करायचा नव्हता, पण आपली भेट होणं शक्य होतं नाहीये. आपल्या दोघांचे कॉलेज वेगळं-वेगळी आहेत. येताना आपण एकाच बसमधून गावातून तालुक्याच्या ठिकाणी येतो. पण बसमध्ये इतर लोक असतात.
प्रपोज केल्यानंतर तुला राग आला तर.. आरडाओरडा केला तर अख्खा बसमध्ये माझा भरता बनायचा. त्यात तुझ्यासोबत तुझ्या त्या खास मैत्रिणी असतात ना. तुला जर त्यांच्यासमोर विचारलं तर माझ्या मनातील भावना तुझ्या मनापर्यंत पोहचण्याआधी तुझ्या बापापर्यंत पोहचतील. त्यामुळेच मी या पत्रातून माझे प्रेम व्यक्त करतोय.
हे पत्र तर माझं हृदय आहे. नाही म्हणून माझं हृदय तोडू नकोस. पण शेवटी मी तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. पण तुला खरं सांगू का मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. नेहमी मला तुझा भास होतो. तुझे ते काळेभोर डोळे, हवेत उडणारी लट त्यात हळूच चेहऱ्यावर येणारी स्माइल मनाला वेड लावून जाते. स्वप्नातही तुझा हसरा चेहरा मला दिसतो. त्यानंतर मन अस्ववस्थ होतं. यार खूप प्रेम करतो तुझ्यावर..
तुझाच मी...
मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?
जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!
प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!
आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...
भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...
तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.