Uterine Cyst saam tv
लाईफस्टाईल

Uterine Cyst: कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय गर्भाशयातील गाठीवर होणार उपचार; 'या' उपायांनी महिलांना मिळेल आराम

Uterine Fibroid Remedy: गर्भाशयाच्या गाठी (Uterine Fibroids), ज्याला 'फायब्रॉइड्स' असेही म्हणतात. या गाठींमुळे मासिक पाळीतील वेदना, अनियमित रक्तस्त्राव आणि इतर समस्या निर्माण होतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • गर्भपिशवीतील गाठ ही सामान्य पण गंभीर समस्या आहे.

  • ३० ते ५० वयोगटातील महिलांना जास्त धोका असतो.

  • अशोकाच्या सालीचे काढे गाठ कमी करण्यास मदत करतात.

गर्भपिशवीतील गाठ ज्याला वैद्यकीय भाषेत युटेरिन फायब्रॉइड्स म्हणतात. ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य पण गंभीर समस्या आहे. ही समस्या प्रामुख्याने ३० ते ५० वयोगटातील महिलांमध्ये दिसून येतं. हार्मोनल असंतुलन, ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली ही त्याची प्रमुख कारणं मानली जातात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी उपचार न केल्यास ही समस्या वंध्यत्वालाही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

अशोकाच्या सालीचे काढे

आयुर्वेदामध्ये अशोकाच्या सालीला महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. हे काढे गर्भाशयाच्या स्नायूंना बळकटी देतात आणि गाठ वितळवण्यास मदत करतात. हे तयार करण्यासाठी एक चमचा अशोकाच्या सालीची पावडर एक कप पाण्यात उकळा. पाणी अर्धे राहिल्यावर ते गाळून कोमट असताना प्या. सलग एक महिना रोज एकदा हे काढे घेतल्यास लाभ जाणवू शकतो.

आले आणि हळद

गाठ तसंच सूज कमी करण्यासाठी आलं आणि हळद उपयुक्त ठरतात. हळदीत असलेलं कर्क्यूमिन हा घटक सूज आणि गाठ दोन्ही कमी करण्यास सहाय्यक आहे. आलं रक्ताभिसरण सुधारतं आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतं. यासाठी आलं आणि हळदीचा काढा आहारात समाविष्ट करता येतो. एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा आल्याचा रस कोमट पाण्यात मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास फायदा होऊ शकतो.

कोरफड आणि त्रिफळं

शरीरात साचलेल्या विषारी द्रव्यांमुळे गाठ निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरीर शुद्धीकरणासाठी कोरफड आणि त्रिफळं उपयोगी ठरतात. दोन चमचे कोरफडीचा रस आणि एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात मिसळा आणि हळूहळू प्या. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून एकदा हे घेतल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि गाठ हळूहळू कमी होऊ शकते.

बडीशेप आणि मेथी

महिलांमध्ये हार्मोन संतुलन राखण्यासाठी बडीशेप आणि मेथी फार फायदेशीर मानली जाते. त्यांचं नियमित सेवन केल्यास गाठ वितळण्यासही मदत मिळते. यासाठी अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे दाणे चावून खा आणि त्यावर तेच पाणी प्या.

गर्भपिशवीतील गाठीला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात?

युटेरिन फायब्रॉइड्स म्हणतात.

अशोकाच्या सालीचे काढे कशासाठी फायदेशीर आहेत?

गर्भाशयाचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि गाठ वितळवण्यासाठी.

आले आणि हळद कोणत्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत?

सूज कमी करणे आणि हार्मोनल संतुलन राखणे.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणती औषधे वापरावीत?

कोरफड आणि त्रिफळं शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात.

बडीशेप आणि मेथी कशासाठी फायदेशीर आहेत?

हार्मोन संतुलन राखण्यासाठी आणि गाठ कमी करण्यासाठी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील पुसद नाका चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे

Dhairyasheel Mohite Patil : आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर भाषेत उत्तर; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचा बिल्डिंगवरून पडून मृत्यू, ३७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ओबीसी आरक्षणासाठी तरूणाने आयुष्य संपवलं, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT