Nail Paint side effects yandex
लाईफस्टाईल

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Nail paint side effects: नेलपेंट लावणे हे प्रत्येक मुलीला आवडते. परंतु सतत नेलपेंटचा वापर केल्यास गंभीर आजारांचा धोका वाढतो. सतत नेलपेंट लावल्यास आरोग्याची कोणती समस्या होऊ शकते. वाचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकलच्या काळात सुदंर दिसण्यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. सुंदर दिसण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मुलगा असो की मुलगी, प्रत्येकाला आजकाल ट्रेंडनुसार राहायला आवडते. विशेषत: मुलींमध्ये याबाबत वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आपल्या केसांपासून ते नखांपर्यंत सर्व गोष्टींची मुली खूप काळजी घेतात. क्लिन अप , फेशल आणि मॅन्युक्युर, पेडिक्युर सारख्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात.

चांगले दिसण्यासाठी केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच महत्त्वाचे नाही तर इतर गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात. नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतेक मुली नेलपेंटचा वापर करतात. जवळजवळ प्रत्येक मुलीला नेलपेंट लावायला आवडते. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल तर नखांना सुदंर करणाऱ्या नेलपेंटच्या हानिकारक प्रभावांबद्दल नक्कीच जाणून घ्या.

नेलपेंटचे दुष्परिणाम

नेलपेंटचा सारखा वापर केल्याने नखे खराब होतात. नेलपेंट बनवण्यासाठी स्पिरिटचा वापर केला जातो. नेलपेंटमध्ये वापरले जाणारे हे केमिकल आपल्या फुफ्फुसांसाठी अत्यंत हानिकारक आहे. एवढेच नाही तर नेलपेंटमध्ये असलेले केमिकल शरीरात गेल्यास मज्जासंस्था, आतडे आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच कर्करोग आणि त्वचेचा रोग होण्याची शक्यता आहे.

नेलपेंटमध्ये टोल्युएन नावाचे रसायन आढळते, जे नखांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील इतर पेशींमध्ये पोहोचते. शरीरातील पेशींच्या संपर्कात आल्याने हे केमिकल आपल्या मज्जासंस्थेला हानी पोहोचवू शकते.

नेलपेंट बनवण्यासाठी अनेक हानिकारक केमिकल वापरली जातात ज्यामुळे नखे सुंदर दिसतात. या केमिकलपैकी एक केमिकल म्हणजे ऍक्रिलेट्सचाही वापर केला जातो. ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर हे केमिकल त्वचेच्या संपर्कात आले किंवा श्वासोच्छवासाद्वारे शरीरात गेले तर कर्करोगाचा धोका वाढवते.

नेलपेंटच्या धोक्यापासून कशी काळजी घ्यावी

१. सतत नेलपेंट लावणे टाळावे. एखादा कार्यक्रम किंवा सोहळा असतानाच नेलपेंट लावावे.

२. कोणतेही साधारण जेल किंवा पावडर लावून गडद नेलपेंट काढू नये. यासाठी मॅनिक्युरिस्टचा सल्ला घ्यावे.

३. कमी केमिकल असणारे चांगल्या दर्जाचे ब्रॅंडेड नेलपेंट वापरावे.

४.नेलपेंट लावून जास्त दिवसांपर्यंत नखांवर ठेवू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by : Priyanka Mundinkeri

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT