Benefits of sweet lemon peels ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Benefits of Sweet lemon: मोंसबीच्या सालींचा उपयोग असा ही !

मोंसबीची साल आपल्याला अनेकप्रकारे उपयोगी पडू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हळ्यात आपल्याला सर्व ठिकाणी मोसंबी पाहायला मिळते. मोसंबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तिचे सेवन करायला सर्वांना आवडते. मोसंबीची चव आंबट-गोड असते, त्यात अनेक पोषक तत्वांचा खजिना असतो. कारण त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. परंतु, जितके मोसंबीचे खाण्याचे फायदे आहेत तितकेच तिच्या सालीतही फायदे आहे. पण आपण मोसंबी खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतो. मोंसबीची साल आपल्याला अनेकप्रकारे उपयोगी पडू शकतात. मोसंबीची साल कशी वापरायची? त्याचा वापर कसा करावा याविषयी सांगणार आहोत.

हे देखील पहा -

मोसंबीच्या सालीचा उपयोग आपण अशा पध्दतीने करु शकतो.

१. मोसंबीच्या सालीपासून आपण क्लिनर बनवू शकतो. हे क्लिनर अतिशय नैसर्गिक असून त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाहीत. यासाठी एका भांड्यात एक लिटर (Water) पाणी उकळून घ्या. नंतर या पाण्यात मोसंबीची साले घालून पुन्हा पाच मिनिटे उकळू घ्या. त्यानंतर हे पाणी थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर साल पिळून पाणी गाळून वेगळ्या भांड्यात ठेवा. आता त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा कडुलिंबाचे तेल (Oil) मिसळा. नंतर स्प्रे बाटलीत भरून ठेवा. आपण तयार केलेले क्लिनर बाथरूम, स्वयंपाकघर आणि भांडी स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकतो. यासोबतच कुंडीतून येणारा वास दूर ठेवण्यासाठी आणि झाडाला कीटकांपासून दूर ठेवण्यासाठीही याचा वापर करता येईल.

२. त्वचेसाठी जितकी लिंबाची साल उपयुक्त असते तितकीच ती मोसंबीची साल फायदेशीर ठरु शकते. आपण त्वचेसाठी मोसंबीची साल वापरू शकतो. यासाठी भांड्यात पाणी उकळत ठेवून यानंतर पाण्यात मोसंबीची साले टाका आणि पुन्हा काही वेळ उकळा. त्यानंतर हे पाणी थंड होऊ द्या. थंड झाल्यावर साले चांगली पिळून घ्या. नंतर हे पाणी गाळून वापरावे. हे पाणी आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळू शकतो. तसेच कॉटन बॉलच्या मदतीने आपण ते आपल्या त्वचेवर देखील लावू शकतो. याचा वापर केल्याने त्वचेवरील खाज आणि डाग यांसारख्या समस्या दूर होतील, तसेच आपल्याला ताजेतवाने वाटेल.

अशाप्रकारे मोसंबीच्या सालीचा उपयोग करू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT