Menstruation Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Menstruation Care Tips : मासिक पाळी दरम्यान अशा पद्धतीची अंडरवेअर वापरा, हायजीनसोबत अतिशय कम्फर्टेबल

Menstruation Care : मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मुलींना हायजीन आणि कंफर्ट दोन्ही मेंटेन ठेवणे कठीण होऊन जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Menstruation Tips : मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मुलींना हायजीन आणि कंफर्ट दोन्ही मेंटेन ठेवणे कठीण होऊन जाते. तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये टेंनपूंस, मेंस्त्रुवाल कप उपलब्ध असतात. परंतु अनेक स्त्रिया मुली पॅडचा वापर जास्त प्रमाणात करतात.

पॅड वापरल्याने आराम आणि हायजिनकडे लक्ष देणे कठीण होऊन जाते. कारण की यामध्ये हेवी फ्लो होण्याचा खतरा असतो. सोबतच पॅडला योग्य वेळेवर बदलणे गरजेचे असते. या सगळ्या समस्यांना पाहता पिरियड्स पॅन्ट बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या पॅंटीमध्ये तुम्ही त्याला कंफर्टेबल फील करू शकता. सोबतच हेवी फ्लो आणि डागांपासून वाचू शकता.

पिरियड पॅंटीज म्हणजे नेमके काय?

मासिक पाळी दरम्यान वापरात येणारी ही अंडरवेअर अतिशय कम्फर्टेबल असते. यामुळे अनेक स्त्रियांना (Women) ही पॅन्ट घालण्यास आवडते. अशा प्रकारच्या अंडरवेअरसोबत तुम्ही पॅडला सुद्धा अगदी कम्फर्टेबलपणे युज् करू शकता. भलेही ही अंडरवेअर जरा महाग असेल परंतु यांना धुवून पुन्हा वापर केला जाऊ शकतो.

विशेष असं काय आहे -

पिरियड अंडरवेअर मासिक पाळी (Menstruation) दरम्यान होणाऱ्या फ्लोला अवशोषित करण्याचे काम करते. ज्या महिलांना जास्त प्रमाणात मासिक पाळीचा त्रास होऊन हेवि फ्लो होतो त्यांच्यासाठी ही अंडरवेअर अतिशय उत्तम आहे.

ज्या महिलांना युरीन लिकेज आणि व्हाइट डिस्चार्जची समस्या असते त्यांच्यासाठी ही अंडरवेअर अतिशय बेस्ट मानली जाते. या अंडरवेअरमुळे ओलेपणापासून सुटकारा मिळतो आणि कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही. त्यामुळे तुम्हीही अंडरवेअर पूर्ण दिवस वेअर करून कम्फर्टेबल राहू शकता.

किती वेळा पर्यंत वेअर केली जाऊ शकते -

पीरियड पॅंटीज एका वेळेला बारा तास वापरली जाऊ शकते. त्यानंतर ही पॅन्ट तुम्ही बदलू शकता. पिरियड अंडरवेअरला कम्फर्टेबल बनवण्यासाठी मुलायम कपडे लावले गेलेले असतात. सोबतच ही अंडरवेअर वेअर केल्यानंतर पॅड इकडे तिकडे सरकत नाही. सोबतच नॉर्मल अंडरवेअर सारखीच या पॅंटीला वापरले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

SCROLL FOR NEXT