ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

आपल्या स्वयंपाकघरात गरम पाण्याचा उपयोग असा करा!

गरम पाण्याचा उपयोग फक्त आंघोळीसाठी आणि भांडी धुण्यासाठी आपण करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आपण आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतो, पण या गरम पाण्याचा वापर आपण इतर अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. स्वयंपाकघरातील अनेक कामे करण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर अगदी सहज करू शकतो. स्वयंपाकघर साफ करण्यापासून ते सिंक उघडण्यापर्यंत गरम पाण्याचा (Water) उपयोग आपल्याला होऊ शकतो. आज आपण गरम पाण्याशी संबंधित काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

हे देखील पहा -

स्वयंपाक घरात गरम पाण्याचा उपयोग कसा कराल -

१. स्टीलच्या वाट्या, चमचे, ताट आदी नवीन भांड्यांवर कागदाचे टॅग असतात. अनेकवेळा घासूनही ते निघत नाही. अशावेळी टॅग लवकर काढायचे असतील तर गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा. ते सहज निघेल. तसेच भांड्यांवरील टॅगच्या गमामुळे घाण पसरते असे वाटत असेल तर त्यात थोडासा लिंबाचा रस किंवा पांढरा व्हिनेगर टाकू शकतो.

२. फ्रीजमध्ये बटर ठेवले असेल तर ते काढणे खूप कठीण होते. अशावेळी आपण सुरी गरम पाण्यात ठेवावी. लोणी, तूप, चीज इत्यादी सहज काढता येते.

३. स्वयंपाकघरातील काउंटर, खिडकी, गॅस इत्यादींवर तेलाचे (Oil) डाग असल्यास गरम पाण्याने साफ करावे. असे केल्याने किचन काउंटरमध्ये साचलेली घाण व दुर्गंधी दूर होईल.

४. स्वयंपाकघरातील (Kitchen) सिंकमध्ये घाण अडकली असेल तर गरम पाण्याने आपण दुरुस्त करू शकतो. यासाठी गरम पाण्यात थोडेसे व्हिनेगर मिसळून ते सिंक होलच्या आत ओतावे. अडकलेली घाण सहजपणे पाईपमधून बाहेर पडेल.

५. कपड्यावरील किंवा जमिनीवरील अन्नाचे डाग काढून टाकण्यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर करु शकतो. अमोनिया कोमट पाण्यात मिसळून डाग काढू शकतो. रंगीत कपड्यांवरील डाग काढण्यासाठी अमोनियाऐवजी आपण लिंबाच्या रसाचा वापर गरम पाण्यासोबत करु शकतो.

अशाप्रकारे गरम पाण्याचा वापर करु शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

Fansachi Rassa Bhaji Recipe : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

SCROLL FOR NEXT