Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : चेहऱ्याची कांती उजळवण्यासाठी असा करा केळीचा वापर, दिवसभर राहाल ग्लो !

Skin Care Face Packs : तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी आणि त्वचे संबंधित इतर समस्या दूर करण्यासाठी केळीचा वापर करू शकता.

कोमल दामुद्रे

Banana Face Packs : फळे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी ही खूप फायदेशीर असतात. चेहऱ्यावरील त्वचेसाठी फळांचा वापर करून त्वचेच्या समस्या दूर करता येतात. त्यामुळे काही लोक घरच्या घरी पपई, संत्री ,टरबूज या फळांनी चेहरा क्लीन करतात. फ्रुट पेस्ट चेहरा डीप क्लिनिंगसाठी केला जातो.

त्यासोबतच तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी आणि त्वचे संबंधित इतर समस्या दूर करण्यासाठी केळीचा वापर करू शकता. व्हिटॅमिनस (Vitamins) आणि खनिजे केळींमध्ये आढळतात. त्यामुळे खडबडीत त्वचा सॉफ्ट होते. चला तर मग जाणून घेऊया आपण केळीचा वापर त्वचेसाठी (Skin) कसा करू शकतो.

1. चेहरा क्लीन कसा करायचा

केळीपासून (Banana) स्क्रब बनवून तुम्ही चेहरा क्लीन करू शकता यासाठी तुम्हाला केळी मॅश करावे लागेल. नंतर त्यात साखर आणि मध टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. आता ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पॅक चा वापर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करणे गरजेचे आहे. जर तुमची कोरडी त्वचा असेल तर या पॅकचा वापर केल्यानंतर चेहरावर ओलावा दिसून येईल.

2. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही केळी मॅश करून त्यात मध आणि लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण चांगले एकजीव करून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. याने गडद डाग हलके करण्यास आणि त्वचेचा टोन स्वच्छ करण्यास मदत मिळते. तर मध त्वचेला शांत करते आणि दुसरीकडे लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवरून काळे डाग दूर करण्यासाठी मदत करते.

3. त्वचा ग्लो करण्यासाठी या पद्धतीने केळीचा वापर करा

ग्लोविंग स्किन मिळवण्यासाठी तुम्ही केळीमध्ये कच्चे दूध, मध आणि गुलाबजलचे काही थेंब मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही तयार केलेली पेस्ट पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर चेहरा पाण्याने (Water) धुवा. या मास्कचा वापर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करा. निरोगी त्वचेसाठी आवश्यक पोषक घटक केळींमध्ये असतात. तर दूध त्वचेला एक्सफोलिएशन देते आणि गुलाबजलमुळे त्वचा ग्लो करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गृहिणी ते खासदार, आता उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, VIDEO

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोण आहेत?

मी सुनेत्रा अजित पवार....; महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Hair Fall Control: केस होतील मुलायम अन् मजबूत; रोज फॉलो करा ही १ ट्रिक

SCROLL FOR NEXT