Diabetes control SAAM TV
लाईफस्टाईल

Diabetes Control : मधुमेहावर घरच्या घरी नियंत्रण आणा, 'या' डाळीचे सेवन संजीवनी बूटीचे काम करेल

Urad Dal Health Benefits : दिवसेंदिवस मधुमेहाचे रुग्ण वाढत जात आहे. अशात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोजच्या आहारातील उडीद डाळ फायदेशीर ठरते. फायदे जाणून घ्या.

Shreya Maskar

बदलती जीवनशैली आणि पोषक तत्वाच्या अभावामुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. रोजच्या आहारात भातासोबत आपण डाळ, आमटी, कढी यांचे सेवन करतो. मात्र भातासोबत डाळीचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

बाजारात विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध आहेत. मात्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडीद डाळ रामबाण उपाय आहे. नियमित उडीद डाळीचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. उडीद डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि पोषक तत्वे असतात.

उडीद डाळ पोषक घटक

उडीद डाळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी दररोज उडीद डाळीचे सेवन करावे. उडीद डाळीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, व्हिटामिन्स यांचे प्रमाण जास्त असते.

उडीद डाळीचे आरोग्याला फायदे

वजन कमी

उडीद डाळीचे सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहून भूक नियंत्रणात राहते. यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुरळीत

मधुमेहाच्या रुग्णांना पचनक्रिया सुधारणे महत्त्वाचे असेत. उडीद डाळीमधील फायबरचे प्रमाण पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. उडीद डाळीमुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही. पोट दुखी , ॲसिडीटी दूर होते.

मधुमेह

उडीद डाळीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तुम्ही उडीद डाळीची खिचडी, पराठा, भात इत्यादी पदार्थ खाऊ शकता.

हृदयाचे आरोग्य

उडीद डाळीमधील पोटॅशियम, व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म हृदयाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. उडीद डाळीमुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

स्नायूंचे आरोग्य

उडीद डाळीमधील कॅल्शियम आणि व्हिटामिन्स आपल्या हाडांचे आरोग्य सुधारते. मधुमेहात स्नायूंचे दुखणे वाढले असल्यास उडीद डाळीचे सेवन करावे. हाडे कमकुवत न होता, हाडांना बळ मिळते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

उडीद डाळीचे पाणी प्यायल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अधिक काळ मूड रिफ्रेश राहतो. उडीद डाळीमधील लोहामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. शरीरात लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. तसेच शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT