Online payment  Canva
लाईफस्टाईल

Offline Payment: आता इंटरनेट शिवाय फक्त मिस कॉलनेही होईल 'UPI पेमेंट', जाणून घ्या कसं

UPI 123Pay : आता इंटरनेट शिवाय फक्त मिस कॉलनेही होईल 'UPI पेमेंट'

Satish Kengar

UPI 123Pay : सध्या देशात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढला आहे. आजकाल प्रत्येकजण पेटीएम किंवा यूपीआयद्वारे पेमेंट करतो. म्हणूनच चहा टपरीवरही युपीआय स्कॅनर आपल्याला पाहायला मिळतो. डिजिटल पेमेंट ट्रेंडमुळे आता अनेक लोकं आपल्या जवळ कॅश बाळगणं टाळतात. अशातच जर तुम्ही तुमचं इंटरनेट गंडलं तर तुम्हाला युपीआय पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

स्लो इंटरनेट कनेक्शनमुळे अनेक वेळा ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी रिझर्व्ह बँकेने UPI 123Pay लॉन्च केले आहे. याच्या मदतीने तुम्ही कुठेही, कधीही पेमेंट करू शकता. मात्र याचा वापर नेमका कसा करावा? याचबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. (Latest Marathi News)

अशा प्रकारे तुम्ही करू शकता पेमंट

जर तुम्हाला इंटरनेटच्या बिघाडामुळे UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट करण्यात समस्या येत असेल, तर तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल आणि यानंतर तुम्ही सहज पेमेंट करू शकला. यासाठी ज्या फोनवरून तुम्ही पेमेंट करता त्या फोनशी तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल. मग या चार पद्धतींनी तुम्ही सहज पेमेंट करू शकाल. (UPI SERVICE)

मिस कॉल - तुमच्याकडे स्मार्टफोन नसला तरीही तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला एका नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. नंतर कॉल बॅक येताच तुमचा नोंदणीकृत नंबर UPI वर टाका. मग तुमचे पेमेंट काही वेळात केले जाईल.

आयव्हीआर (IVR) – आयव्हीआर म्हणजे जर तुम्हाला कुठे पैसे भरायचे असतील तर तुम्हाला आयव्हीआर नंबरवर कॉल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पसंतीची भाषा निवडावी लागेल. मग तुम्हाला आयव्हीआरवर सांगितल्याप्रमाणे पुढे जा आणि तुमचा UPI नंबर टाका. आता भरायची रक्कम प्रविष्ट करा आणि पुढे जा. यानंतर तुम्ही हवे त्याला सहज पैसे पाठवू शकता.

UPI अॅप्लिकेशन - हे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही स्कॅन आणि पे याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे पैसे देऊ शकता.

प्रॉक्सिमिटी साउंड पेमेंट – या तंत्राद्वारे पेमेंट करण्यासाठी साउंड वेब्सचा वापर केला जातो. तुम्ही ते स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्हीवर वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT