Upcoming Royal Enfield Bikes Saam Tv
लाईफस्टाईल

Upcoming Royal Enfield Bikes : Royal Enfield 2023 मध्ये लाँच करणारे दोन नव्या बाईक; जाणून घ्या, मॉडेल

सध्या भारतात याचे प्रचंड क्रेझ आपल्याला पाहायला मिळते.

कोमल दामुद्रे

Upcoming Royal Enfield Bikes : रॉयल एनफिल्ड ही प्रत्येक तरुणांची प्रिय अशी बाईक आहे. सध्या भारतात याचे प्रचंड क्रेझ आपल्याला पाहायला मिळते. रॉयल एनफिल्ड कंपनीची भारतीय मोटरसायकल बाजारपेठेत एक वेगळी ओळख आहे. चेन्नईस्थित मोटारसायकल ब्रँड देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेसाठी नवीन बाइक्स सादर करण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुढील वर्षी 350cc सेगमेंटमध्ये दोन नवीन बाइक लॉन्च करू शकते. क्रूझर बाईक निर्माता 2023 मध्ये क्लासिक 350 ची बॉबर आवृत्ती आणि बुलेट 350 चे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च करू शकते.

Royal Enfield ने नोव्हेंबर 2022 मध्ये फ्लॅगशिप Super Meteor 650 मोटरसायकलचे अनावरण केले. आगामी बाईकची किंमत पुढील महिन्यात जाहीर केली जाऊ शकते. त्याच वेळी, Meteor 650 ची डिलिव्हरी देखील फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू केली जाऊ शकते. गाडीवाडी या ऑटो वेबसाइटनुसार, कंपनी क्लासिक 350 चे बॉबर व्हर्जन आणि बुलेट 350 चे नवीन जनरेशन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

1. हंटर 350 वाढवली आशा

Hunter 350

350cc सेगमेंटमध्ये कंपनीने यावर्षी हंटर 350 लाँच केले आहे. या बाइकला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता हंटर 350 ही मोटरसायकल कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक बनली आहे. कंपनीला ही वाढ कायम ठेवायची आहे. त्यामुळे बाजारात (Market) 350cc इंजिनची नवी बाईक दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीला विक्रीतील तेजी कायम ठेवण्यास मदत होईल.

2. नवीन जनरेशन बुलेट 350

New Generation Bullet 350

रॉयल एनफील्डच्या आगामी बाइकबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी बुलेट 350 चे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च करू शकते. न्यू जनरल बुलेट अनेक वेळा दिसली आहे. नवीन बाईक क्लासिक, हंटर आणि मेटिअर सारख्या दुहेरी क्रॅडल फ्रेमवर विकसित केली जाऊ शकते. सध्याची बुलेट 350 ही कंपनीची सर्वात स्वस्त बाइक (Bike) आहे. अशा परिस्थितीत नवीन बुलेट कोणत्या रेंजमध्ये आणली जाईल हे पाहावे लागेल.

3. क्लासिक 350 बॉबर आवृत्ती

Classic 350

क्लासिक 350 ही रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. त्याच्या यशाचा फायदा घेत, कंपनी क्लासिक 350 ची सिंगल सीटर आवृत्ती लॉन्च करू शकते. क्लासिकची आगामी बॉबर आवृत्ती जावा 42 बॉबर आणि जावा पेराक यांच्याशी स्पर्धा करेल. नवीन बाईकचे फूटपेग पुनर्स्थित केले जाऊ शकतात आणि त्यास उच्च हँडलबार सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT