Unique Customer ID For Mobile Saam Tv
लाईफस्टाईल

Unique Customer ID :युनिक आयडीमुळे स्कॅमर्सला बसणार आळा, सरकारचे महत्त्वाचे पाऊल

Mobile Customer ID Users: मोबाईलला आता युनिक आयडी देण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Unique Customer ID For Mobile Users :

सध्याच्या काळात सर्वजण मोबाईलवर अवलंबून असतात. मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. सर्वजण मोबाइलचा वापर करतात. मोबाईलसंबंधित आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल ग्राहकांना आता युनिक आयडी देण्यात येणार आहे. सरकारने हा निर्णय घेतला आहे.

युनिक आयडी वन-स्टॉप आयडेंटिफिकेशन पॉइंट म्हणून काम करेल. युजर्संना फ्रॉडला बळी पडण्यापासून वाचवण्यासाठी हा आयडी काम करेल. तसेच काही ग्राहकांना सरकारकडून मिळणारा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाईल युनिक आयडी ही संकल्पना आधार कार्डशी जोजलेल्या आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ अकाउंट(ABHA) हेल्थ आयडी सारखीच आहे. यामध्ये सर्व वैद्यकीय माहिती समाविष्ट असते.तसेच

मोबाईल ग्राहकांची माहिती घेण्यासाठी युनिक आयडी मदत करते. सिम कार्डची माहिती घेण्यासाठी, कार्ड कुठून खरेदी केले तसेच ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी युनिक आयडीचा वापर केला जाईल. युनिक आयडीमुळे युजर्सची सर्व माहिती मिळणार आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या नते, दुरसंचार विभाग फसव्या फोनचे कनेक्श रोखण्यासाठी पाऊल उचलत आहे. त्यातील एक पर्याय म्हणजे युनिक कन्झ्युमर आयडी. युनिक कन्झ्युमर आयडीद्वारे युजर्संना ट्रॅक करणे सोपे होणार आहे.

सरकारने याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. ज्यात सिम कार्ड विक्रेत्यांची नोंदणी करणे, त्यांना सिस्टीममध्ये ऑनबोर्ड करण्यापूर्वी केवायसी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सिम कार्डची मोठ्या प्रमाणात विक्री करणे आवश्यक आहे. हे नवीन नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

गेल्या सहा महिन्यात, जवळपास 6.4 दशलक्ष फसव्या फोनचे कनेक्शन डिसकनेक्ट केले आहेत. हे फसवे फोन रोखण्यासाठीच युनिक आयडी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

Morning Exercise for Weight Loss: वजन कमी करायचंय? सकाळीच करा हे ७ एक्सरसाईज, महिन्याभरात व्हाल फिट

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

बजेटआधीच तिजोरीत खडखडाट; फुकट्या योजनांमुळे राज्य अडचणीत, VIDEO

पैठणची गोदावरी झाली सोन्याची खाण;टोपल्या-चाळण्या घेऊन कुटुंब नदीत, VIDEO

SCROLL FOR NEXT