Umbrella and Raincoat Shopping Saam TV
लाईफस्टाईल

Umbrella and Raincoat Shopping : पावसाळ्याच्या शॉपिंगसाठी मुंबईतील खास मार्केट; छत्री आणि रेनकोट फक्त २५० रुपयांत!

Rain Shopping in Mumbai : जूनच्या अखेरपासून शाळा देखील सुरू होतील. त्यामुळे तुम्ही देखील स्वस्तात छत्री आणि रेनकोट शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मार्केटची यादी आणली आहे.

Ruchika Jadhav

सध्या मे महिना सुरू आहे. मे महिना म्हणजे कडक उन्हाळा. मात्र यंदा काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. मे महिना असूनही यावेळी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. पावसामुळे काही काळ छान वाटत असलं तरी खेड्यांसह शहरात नागरिकांनी छत्री खरेदीसाठी घाई केली आहे.

गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. बदलापूरमध्ये गारांचा पाऊस झाला आहे. अशात आता जूनच्या अखेरपासून शाळा देखील सुरू होतील. त्यामुळे तुम्ही देखील स्वस्तात छत्री आणि रेनकोट शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मार्केटची यादी आणली आहे.

कुलाबा

मुंबईमधील कुलाबा मार्केटमध्ये तुम्हाला ब्रिटिशकालीन इमारती पाहायला मिळतील. येते फार स्वस्तात वस्तू मिळतात. कपड्यांपासून ते अन्य रोजच्या वापरण्याच्या वस्तूंपर्यंत सर्व वस्तू येथे कमी किमतीत मिळतात.

दादर मार्केट

दादरला स्टेशनमधून उतरल्यानंतर सरळ छ्त्रपती शिवाजी पार्कच्या मार्गाने गेल्यास तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग करता येईल. या मार्केटमध्ये तुम्हाला पावसाळ्यात वापरण्याचे श्युज, छत्री आणि रेनकोट देखील मिळतील.

चोर बाजार

मुंबईतील चोर बाजार गल्ली देखील स्ट्रीट शॉपिंगसाठी फार प्रसिद्ध आहे. येथे देखील तुम्हाला विविध शोभेच्या वस्तू पाहायला मिळतील. विशेष म्हणजे या बाजारात तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून रोजच्या वापरण्याच्या सर्व वस्तू खेळणी आणि कपडे देखील अतिशय स्वस्त दरात मिळतील.

गजानन मार्केट

ठाण्यातील उपनगर असलेल्या उल्हानगर शहरात एक गजानन मार्केट आहे. या मार्केटमध्ये देखील तुम्ही पावसाळ्यासाठी शॉपिंग करू शकता. येथे रेट सुरुवातीला थोडे जास्त सांगितले जातात. मात्र बर्गेनिंग केल्यास येथे तुम्हाला अतिशय स्वस्त दरात वस्तू मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT