Processed Foods Saam tv
लाईफस्टाईल

Processed Foods : तुम्हालाही बाहेरचे चटकदार पदार्थ खाण्याची सवय आहे? जडू शकतात ३२ पेक्षा जास्त गंभीर आजार, संशोधनातून खुलासा

Ultra Processed Food Causes : कामाच्या वाढत्या व्यापामुळे आपल्यापैकी अनेकजण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. सतत बाहेरचे पदार्थ खातात.

कोमल दामुद्रे

Processes Foods Side Effects :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कामाच्या वाढत्या व्यापामुळे आपल्यापैकी अनेकजण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. सतत बाहेरचे पदार्थ खातात.

बिझी शेड्युलमध्ये बिस्कीट, स्नॅक्स, चिप्स, पिझ्झा- बर्गर सारखे पदार्थ खाऊन आपले पोट भरतात. पण यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अनेकांना प्रोसेस्ड फूड्स खाण्याची इतकी सवय लागली आहे की, ज्यामुळे ३२ पेक्षा जास्त गंभीर आजारांना (Disease) सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय?

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स हे आपल्या घरात बनत नाही. यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे ते अधिक काळ टिकतात. याशिवाय अजिनोमोटोसारख्या चव वाढवल्या जाणाऱ्या गोष्टीही यामध्ये असतात. यात सर्वाधिक फास्ट फूड, आइस्क्रीम, सॉस, ब्रेड, बिस्किटे, कार्बोनेटेड पेये, फळांचा रस, दही, रेडीमेड सूप आणि व्हिस्की यांसारख्या पदार्थांचा (Food) अधिक समावेश असतो.

2. संशोधनातून धक्कादायक खुलासा

ब्रिटिश जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालातून असे कळाले की, प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराच्या संबंधित मृत्यूचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो. याशिवाय मानसिक विकार देखील जडतात. सतत चिंता करणे, मूड स्विंग्स, मधुमेहाचा (Diabetes) धोका १२ टक्क्यांनी वाढतो.

धक्कादायक बाब अशी की, अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक अन्न हे प्रक्रिया केलेले आहे. या पदार्थांचे ८० टक्के तरुण नियमित सेवन करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT