Monsoon care tips, Mobile phone
Monsoon care tips, Mobile phone ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात फोन भिजल्यानंतर हे उपाय करुन पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळ्यात बऱ्याचदा आपल्याला कामानिमित्त घराबाहेर जावे लागते. त्यामुळे आपल्यासोबत आपण वापरणाऱ्या इतर वस्तूंची देखील काळजी घ्यावी लागते.

हे देखील पहा -

पावसाळ्यात फोनमध्ये किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये पाणी गेल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कितीही उपकरणांची काळजी घेतली तरी ती पावसाच्या पाण्यात आपल्याकडून भिजली जातात अशावेळी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया.

१. खूप जास्त पाऊस येत असेल तेव्हा आपण आपला फोन बंद ठेवायला हवे. फोन चालू असल्यामुळे त्यात पाणी जाऊन त्याच्या आतील सर्किट्सचे नुकसान होते त्यामुळे अशावेळी त्वरीत फोन बंद करावा.

२. पावसाळ्यात (Monsoon) काळजी घेऊन सुध्दा आपला फोन (Phone) पावसात भिजला असेल तर त्याला स्वच्छ व कोरड्या कापडाने पुसून घ्या. यानंतर बॅटरी किंवा सिम कार्ड काढून टिश्यू पेपरने स्वच्छ करा. घरी असाल तर फोनला २४ तास तांदळात ठेवा आणि बाहेर असाल तर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा. हे फोनमधील अतिरिक्त मॉइश्चरायझर शोषून घेण्याचे काम करते.

३. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काम करताना फोन वापरण्याची सवय असते. काम करताना फोन पाण्यात पडल्यानंतर हेअर ड्रायरने वाळवण्याची चूक करू नका. यासाठी कच्चे तांदूळ, ब्लॉटिंग पेपर किंवा सूर्यप्रकाश हा पर्याय उत्तम असेल. फोन थोडा फार सुकल्यानंतर त्याला उघडून ठेवा. एका तासापेक्षा जास्त काळ फोनला उन्हात ठेवू नका. असे केल्याने स्मार्टफोनचे प्लास्टिकचे भाग खराब होऊ शकतात.

४. फोन ओला झाल्यानंतर त्याला लगेच चार्जिंगला लावू नका त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते ज्यामुळे आपला फोन खराब होण्याची शक्यता वाढू शकते. तसेच पाण्यात भिजल्याने स्मार्टफोन नीट काम करत नाही असे वाटत असेल तर लगेच सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन त्याची तपासणी करून घ्या.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT