Sharavni somvar recipe, Recipe, Food ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Shravan Recipe 2022 : श्रावणात उपवास करताय तर ही रेसिपी नक्की ट्राय करुन पहा

उपवासाच्या दिवशी ही रेसिपी ट्राय करुन पहा

कोमल दामुद्रे

मुंबई : श्रावण महिना हा अनेक व्रत - वैकल्याचा महिना आहे. यात प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले जाते.

हे देखील पहा -

श्रावण महिन्यात आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा उपवास असतो. श्रावणी सोमवारच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. दिवसभरात काहीच न खाल्ल्याने आपल्याला अॅसिडीटी, गॅसची समस्या किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. या महिन्यात अनेक सण-उत्सव असतात ज्यामुळे अनेक पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते. श्रावण मास ही अशी वेळ आहे जेव्हा सत्त्वगुणांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.अनेक स्त्रिया दर मंगळवारी मंगळा गौरी व्रतही करतात अशावेळी त्यांनी उपवासाचे कोणते पदार्थ खायला हवे हे जाणून घेऊया.

साबुदाण्याचा पराठा

साहित्य -

भिजवलेला साबुदाणा - १ कप

उकडलेले बटाटे (Potatoes) - २

चिरलेली कोथिंबीर - १ कप

आवश्यकतेनुसार मीठ

साखर (Sugar) - १ चमचा

बारिक चिरलेली हिरवी मिरची - १ चमचा

लिंबाचा रस - १ चमचा

राजगिऱ्याचे पीठ - १ मोठा चमचा

शेंगदाण्याचा कुट - अर्धी वाटी

कृती -

सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्याला किसून घ्या. त्यात साबुदाणा, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कुट, लिंबाचा रस, हिरवी मिरची व स्वादानुसार मीठ घालून एकत्र करुन घ्या. याला घट्ट करण्यासाठी त्यात राजगिऱ्याचे पीठ घाला. त्यानंतर ते चांगल्याप्रकारे एकजीव करुन घ्या. हाताला तेल लावून याचे छोटे गोळे तयार करा व हाताने प्रेस करुन पुऱ्यासारखे बनवा. नंतर पॅनवर चांगले भाजून घ्या व दह्याच्या रायत्यासोबत सर्व करा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Eknath Shinde : नोटीस कोणत्या अधिकाराने थांबवली? उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना सवाल |VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

SCROLL FOR NEXT