मुंबई : योगासने केल्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारींवर मात करता येते. वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराला लवचिक बनवण्यासाठी योग अधिक फायदेशीर ठरतो.
हे देखील पहा -
अंडाशये ही स्त्रीच्या प्रजननतंत्राचा महत्त्वपूर्ण भाग असून अंडोत्सर्गाच्या प्रक्रियेत ते मदत करतात. मासिक पाळी दरम्यान या ही अंडी विरघळ्यास मदत होते. परंतु, त्यातील एक ही अंडी विरघळण्यास किंवा उत्सर्जित करण्यास अपयशी झाल्यास आपल्या गर्भाशयाच्या ठिकाणी गाठ निर्माण होते व त्याचा परिणाम आपल्या मासिक पाळीवर होतो. अंडाशयात गाठ निर्माण झाल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो अशावेळी आपण योगासनांची (Yogasana) मदत घेऊ शकतो. यामुळे गाठीचा आकार कमी होऊन आपल्याला या आजारावर मात करता येऊ शकते.
१. मासिक पाळीच्या ताण तणावातून मुक्त होण्यासाठी आपण फुलपाखराचा योग करु शकतो. हा एक साधा योग असून याचा फायदा आपल्या मांड्यांसाठी अधिक फायदेशीर (Benefits) होईल.
२. व्यवस्थित मांडी घालून आपण दोन्ही हात सरळ रेषेत जोडून बसावे. यामुळे आपला तणाव कमी होईल व आपल्या पोटाच्या अवयवांना उत्तेजित करण्यास मदत होईल.
३. कोब्रा पोझिशन हा योग शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. तसेच चिंता व तणाव देखील दुर करते. पाठीच्या खालच्या वेदना व जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात.
४. एका जागी मांडी घालून बसावे व मानेला एका बाजून फिरवावे याला आपण भारद्वाजासन म्हणून ओळखतो. यामुळे आपली चयापचय सुधारण्यास मदत होते व ओटीपोटीचे अवयव पुन्हा व्यवस्थितरित्या कार्य करतात. हे योगासन गर्भवतींसाठी फायदेशीर आहे.
५. या योगासनांमुळे आपल्या अंडाशयाला आलेली गाठ कमी होण्यास मदत होते. तसेच मासिक पाळीदरम्यान होणारा त्रासही कमी होतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.