कधी कधी नात्यामध्ये जोडीदारासोबत वाद होणे ही गोष्ट सामान्य असते, पण जेव्हा तुमची प्रत्येक गोष्टीवरून भांडणे आणि रुसवे फुगवे व्हायला लागतात, तेव्हा गैरसमज दूर करणे खूप महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे गैरसमज दूर करू शकता. जाणून घेऊयात-
सहानुभूती ठेवा;
लक्षात ठेवा की, व्यक्ती तुमचा जोडीदार होण्यापूर्वी तो एक मनुष्य आहे, म्हणून कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा समजूतदारपणा आपल्याला इतरांना आणि त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो.
नात्यात वेळ द्या;
नातेसंबंध खूप गुंतागुंतीचे असतात, म्हणून त्यांना वेळ देण्याची आणि एफर्ट्सची गरज असते. तुमच्या जोडीदाराच्या गरजा, मानसिक स्थिती आणि इच्छा समजून घेणे हे नेहमीच सोपे नसते. त्यांना काय हवे आहे, त्यांच्या आवडी निवडीबद्दल आपल्याला माहीत आहे असे जरी आपल्याला वाटत असले तरीही आपण कधीतरी चुकू शकतो. त्यामुळे स्वतःला कधीही 'मीच बरोबर आहे' असे समजू नका.
प्रेमाचे कनेक्शन समजून घ्या;
प्रेम म्हणजे नेमकं काय असते आणि यामध्ये एकेमेकांसोबत कसे वागावे हे समजून घेणे महत्वाचे आहे. आधी प्रेमाचे नाते नक्की मजबूत करा. आपण हे देखील जाणून घेतले पाहिजे की प्रेमात समोरच्या व्यक्तीवर कोणतीही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. इतरांऐवजी आधी स्वतःवर नियंत्रण ठेवा.
व्यक्त होण्याची संधी द्या;
कधीही कोणत्याही भांडणावर तोडगा काढण्यासाठी फक्त तुम्हीच बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचेही ऐकले पाहिजे. अशा परिस्थितीत जोडीदाराला त्याचे मत मांडण्याची संधी द्या. त्यांना विचारा की त्यांची तुमच्याबद्दल त्याच्या काय काय समस्या आहेत आणि ते जाणून घेऊन त्यात बदल करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.