Shukra Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar 2023 : या 3 राशींचे भाग्य खुलणार, पुढचे 37 दिवस होणार मालामाल !

Shukra In Kundali : 30 मे 2023 रोजी संपत्ती-विलास, प्रेम-रोमान्सचा कारक शुक्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे.

कोमल दामुद्रे

Shukra Che Rashi Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेत आपली राशी बदलतो. ग्रहांच्या संक्रमणाचा सर्व राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. 30 मे 2023 रोजी संपत्ती-विलास, प्रेम-रोमान्सचा कारक शुक्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे.

चंद्र राशीत शुक्राचे संक्रमण सर्व राशींच्या जीवनावर (Lifestyle) परिणाम करणार आहे. तर दुसरीकडे शुक्राचे हे संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ ठरणार आहे. ७ जुलै २०२३ पर्यंत शुक्र कर्क राशीत राहील यामुळे या ३ राशींचे नशीब उजळणार आहे. शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे पुढील ३७ दिवस या राशींसाठी लकी ठरणार आहेत.

1. मेष :

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण खूप शुभ राहील. या लोकांना जीवनात नवीन घर (Home)-गाडी, सुख-सुविधा मिळू शकतात. मेहनतीचे फळ मिळेल. मैत्री लाभदायक ठरेल. करिअर चांगले होईल. लव्ह लाईफ- वैवाहिक जीवन चांगले राहील. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. घरातील मंदिरात कापूर जाळल्याने अनेक फायदे होतील.

2. मिथुन:

शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या लोकांना लाभ होईल. अचानक पैसे (Money) मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे उत्पन्न वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. पगार वाढू शकतो. व्यापाऱ्यांना खूप फायदा होईल. संतानसुख मिळू शकेल. मंदिरात गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने लाभ होतील.

3. मीन:

शुक्राचे संक्रमण मीन राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक आनंद घेऊन येईल. तुमची प्रगती होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. उत्पन्न वाढेल. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या बळावर तुम्हाला फायदा होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. जीवनसाथीसोबत चांगले जमेल. कुटुंबात प्रेम वाढेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! दिवाळीपूर्वी DA वाढणार? जुलैच्या महागाई भत्त्याबाबत मोठी अपडेट

Sanjay Raut: 500 कोटी कोणी दिले आणि कुठे गेले? संजय राऊतांनी अमित शाहांना लिहिलं पत्र, थेट ED ची मागणी

ATM Safety Tips: एटीएममधून पैसे काढताना चुकूनही करू नका 'या' 5 चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान!

Maharashtra News Live Update: स्वारगेट चौकात बसला आग; मोठी दुर्घटना टळली

Poha Chivda Recipe : दिवाळीत पोह्यांचा चिवडा बनवताना फक्त 'ही' ट्रिक वापरा, मिळेल बाजारासारखी कुरकुरीत चव

SCROLL FOR NEXT