Paneer:  भारतीय खाद्यपदार्थांमध्ये 'पनीर' कसे पोहचले माहित आहे का?
Paneer: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये 'पनीर' कसे पोहचले माहित आहे का? Saam tv news
लाईफस्टाईल

Paneer: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये 'पनीर' कसे पोहचले माहित आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये (Indian food) पनीरला (Paneer) एक विशेष स्थान आहे. घरातील छोटा समारंभ असो ना मोठी पार्टी, की लग्नसमारंभ. पनीर चा कोणताही पदार्थ हा ठरलेला असतोच. लहान असो हा मोठे, शाकाराही (Vegetarian) असो वा मांसाहारी (Non- Vegetarian) पनीर हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. शाकाहारी लोकांसाठी, मांस आणि अंडी ऐवजी, पनीर पौष्टिक अन्न म्हणून वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का पनीरचा इतिहास, आपल्या भारतीय खादयपदार्थांमध्ये पनीर कसे आले. आपण जे पनीर खातो ते ते भारतीय आहे की परदेशी? चला तर मग पनीरच्या इतिहासापासून ते पनीर भारतीय पदार्थांमध्ये कसे आले ते पाहुया. (Tracing roots: Origins of paneer in India)

Paneer: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये 'पनीर' कसे पोहचले माहित आहे का?

पनीर भारतीय आहे की परदेशी?

मानवी सभ्यतेच्या खाद्यपदार्थांच्या पुस्तकांमध्ये अनेक पदार्थ असून ते त्यात पदार्थाच्या कथांही सांगण्यात आल्या आहेत. इथे प्रत्येक डिश किंवा खाद्यपदार्थाचा स्वतःचा इतिहास तसेच एक रहस्य असते. असेच एक पदार्थ आहे पनीर. पनीर हा पर्शियन शब्द पायनीर (pineer) पासून आला आहे. (Paneer is derived from the Persian word pineer.) भारताबद्दल बोलताना, काही इतिहासकारांच्या मते, पनीर सिंधू संस्कृतीमध्ये देखील बनवले गेले होते. पण नंतर ते लिंबूवर्गीय पाने, फळे आणि साल इत्यादींपासून तयार केले होते.

त्याचवेळी ऋग्वेदातही पनीरचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. पण काहींच्या मते पनीर हे खुप आधीच भारतात बनवले गेले होते. कारण भारतीय सभ्यतेमध्ये दुध फाटणे हे वाईट मानले गेले. तर मंगोलीयांकडून पनीर अस्तित्त्वात आल्याचे काहीजण म्हणतात. मंगोलीय लोक नेहमी युद्धांच्या ठिकाणी राहत असत. अशा काळात काही खाद्यपदार्थ सोबत ठेवत असत. एकदा युद्धावर निघालेले काही मंगोलियांनी आपल्या सोबत एका चामड्याच्या पिशवीत (मुश्की) मध्ये दूध घेतले होते. मात्र वाळवंटातून जात असताना तीव्र उष्णतेमुळे त्यांच्याजवळील दुध फाटले, मंगोल लोकांना खाण्यासाठी काही खाण्यासाठी न मिळाल्यामुळे त्यांनी हेच फाटलेले दुध खाल्ले आणि त्यांना याची चव आवडली.

Paneer: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये 'पनीर' कसे पोहचले माहित आहे का?

मग पनीर भारतात कसा पोहोचला?

पनीरचे जनक कोण आहेत यावर मतभेद आहेत, तर पनीर भारतात कोठून आले याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. पण 16 व्या शतकात जेव्हा अफगाण आणि इराणी राजे आणि प्रवासी भारतात आले तेव्हा ते त्यांच्याबरोबर पनीर घेऊन आल्याचे काहींचे म्हणणे आहे. कुशन-सतवानाच्या युगात (75-300 ई.) गरम आणि अम्लीय दुधाचे पुरावे असल्याचे अने खाद्यपदार्थांच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर, दह्याच्या मिश्रणातून मिळणारा एक प्रकारचा घन पदार्थ तयार करण्यात आला होता, जो सैनिकांच्या अन्नासाठी वापरला जात असे. यावरून अफगाणिस्तान आणि इराणमधून पनीर भारतात आले असावे, हे अगदी खरे ठरू शकते. तसेच, राष्ट्रीय संशोधन संस्थेनेही पनीर इराण आणि अफगाणिस्तानातून आल्याचे मान्य केले आहे.

Paneer: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये 'पनीर' कसे पोहचले माहित आहे का?

पनीर, भारतीयांचे विशेष आवडते!

भारतात पनीर कोणी आणि कसे आणले याबाबत जरी अनेक मतभेद असले तरी, त्यापासून बनवलेले अन्नपदार्थ हे अत्यंत चविष्ट आणि रुचकरर असतात, हे आपण सर्वांनी मान्य केले आहे. पनीरपासून बनवलेले अनेक स्वादिष्ट पदार्थ भारतीयांची पहिली पसंती राहिले आहेत. पनीर हा कर्बोदके, प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. पनीरच्या अनेक प्रकारच्या भाज्या जसे शाही पनीर, पनीर बटर मसाला, कढाई पनीर, पालक पनीर, मिरची पनीर इत्यादी पदार्थ लोकांना खूप आवडतात.

याशिवाय पनीरपासून बनवलेले पराठे नाश्त्यामध्ये वापरले जातात. त्याचबरोबर, पनीरचा वापर करुन बनवलेले व्हेज बिर्याणी, फ्राईड राईस हे पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात. तर पनीरपासून मिठाई देखील तयार केल्या जातात. याशिवाय पिझ्झा, बर्गर आणि सँडविच इत्यादी अनेक फास्ट फूडमध्येही पनीरचा वापर केला जातो.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौंदर्याची क्वीन Sanya Malhotra

Kolhapur News : जत्रेसाठी आलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू

Kolhapur News Today: 4 जणांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू! कोल्हापुरातील आणुर गावातील दुर्दैवी घटना

Today's Marathi News Live : ५० लाखांची रोकड दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT