Top 5G Smartphone Saam tv
लाईफस्टाईल

जबरदस्त बॅटरी, दमदार कॅमेरा; स्वस्तात मस्त Top 5G Smartphone ची लिस्ट एकदा पाहाच

Top 5G Smartphone List : अनेक युजर्सचा कल हा 5G फोनकडे असल्यामुळे कंपन्या देखील कमी किमतीत हा फोन बाजारात लॉन्च करत आहेत. जर तुम्हालाही बजेटमध्ये 5G फोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्याची लिस्ट सांगणार आहोत.

कोमल दामुद्रे

Top 5G Smartphone Under 15000 :

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहे. येत्या वर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून ते इतर अनेक गोष्टींसाठी लॉन्च होतील. सध्या बाजारात 5G ची चर्चा सुरु आहे. त्यामुळे 5G स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अनेक युजर्सचा कल हा 5G फोनकडे असल्यामुळे कंपन्या देखील कमी किमतीत (Price) हा फोन बाजारात लॉन्च करत आहेत. जर तुम्हालाही बजेटमध्ये 5G फोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्याची लिस्ट सांगणार आहोत. या फोनची किमत १० हजार ते १२ हजारांच्या आत आहे. यामध्ये Itel, Nokia, Redmi, IQ आणि Realme या ब्रँडेड स्मार्टफोनचा समावेश आहे.

1. Itel P55 5G

या फोनची (Phone) किमत ९,९९६ रुपये इतकी आहे. फोनमध्ये 6.56 इंचाचा IPS डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस चिपसेट मिळत आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी बॅकअप मिळत आहे. तसेच या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा (Camera) आहे.

2. Nokia G42 5G

या फोनची किमत १२,५९९ रुपये इतकी आहे. फोनमध्ये युर्जसना 6.56 इंच IPS LCD डिस्प्ले मिळत आहे. यात ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्लस चिपसेट मिळत आहे. 5000mAh बॅटरी बॅकअप मिळत आहे. यामध्ये ५० मेगापिक्सेल ट्रिपल रिर कॅमेरा आहे. तसेच 5G ची कनेक्टिव्हिटी देखील यात मिळत आहे.

3. Redmi 13C 5G

Redmi 13C स्मार्टफोन MediaTek Dimensity 6100+ 5G चिपसेट मिळत आहे. फोनमध्ये ग्राहकांना ६.७४ इंच एचडी+ डिस्प्ले मिळत आहे. तसेच याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. फोनमध्ये तुम्हाला 50MP AI ड्युअल कॅमेरा सेन्सर मिळत आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी सपोर्ट मिळत आहे. या फोनची किमत साधारणत: ११,९९९ रुपये इतकी आहे.

4. iQOO Z6 Lite 5G

iQOO Z6 Lite 5G मध्ये तुम्हाला ६.५८ इंचचा डिस्प्ले मिळत आहे. हा फोन ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसरसह मिळत आहे. यामध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा मिळत आहे. या फोनची किमत १३ हजार रुपये इतकी आहे.

5. Realme Narzo 60x 5G

Realme Narzo 60x 5G चा हा स्मार्टफोन 2TB मेमरी सपोर्टसह येतो आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेन्सर मिळत आहे. फोनमध्ये 33W Supervooc चार्जिंग सपोर्टह मिळत आहे. या फोनची किमत १३ हजार रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : श्रीनिवास पवार बारामती मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT