वीकेंडला मुंबईजवळच कुठे तरी बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर, कल्याण हे बेस्ट ठिकाण राहील. येथे तुम्ही कुटुंबासोबत एक दिवसाची पिकनिक प्लान करू शकता. कल्याण हे ऐतिहासिक काळापासूनचे एक प्रसिद्ध बंदर आहे. कल्याणला मुंबईचे प्रवेशद्वार देखील म्हटलं जाते. मुंबईच्या सेंट्रल रेल्वेतून डोंबिवलीच्या पुढे कल्याण (Kalyan ) येते.
कल्याण शहर हे उल्हास नदी-खाडीकिनारी वसलेले आहे. परंतु वसईपासून आलेल्या उल्हास नदीच्या खाडीतून फार पूर्वीपासून जलवाहतूक सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे दुर्गाडी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. या किल्ल्यावर मंदिर देखील बांधण्यात आले आहे.
कल्याण मधील काळा तलाव स्थानिक लोकांचे आकर्षण आहे. सध्या हे तलाव कल्याणकरांचे विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. तसेच या तलावाच्या जवळ बाग देखील आहे. जिथे लहान मुलं मजा-मस्ती करताना पाहायला मिळतात. तुम्ही येथे बोटिंग करण्याचा आनंद देखील घेऊ शकता. संध्याकाळी येथील वातावरण निवांत आणि मनाला मोहून टाकणारे असते.
कल्याण मधील श्री विष्णू मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. असे बोले जाते की, लेंडी तलावामध्ये विष्णूची मूर्ती सापडली आणि त्याच मूर्तीचे पुढे मंदिर उभारण्यात आले. ही श्री विष्णू मूर्ती खूप आकर्षक आहे. कल्याणच्या स्थानिक लोकांचे हे आराध्य दैवत आहे.
कल्याणजवळ मलंगगड वसलेला आहे. येथे अनेक पर्यटक भेट देतात. डोंगर रांगेतून हा गड आकर्षक दिसतो. या किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. येथे तुम्ही लहान मुलांना आवर्जून घेऊन जा.
कल्याण पश्चिमेकडून तुम्ही बिर्ला मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.