आता सर्वत्र दिव्यांची रोषणाई आणि खाद्यपदार्थांची मेजवानी पाहायला मिळत आहे. दिवाळीची भन्नाट सुरूवात झाली आहे. आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत सर्वजण दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळी म्हटलं की सुट्ट्या आल्याच. यंदा दिवाळीला आपल्या प्रियजनांसोबत लाँग वीकेंड प्लान करा. मात्र तुम्हाला प्रवास कमी आणि धमाल मस्ती जास्त करायची असल्यास मुंबईजवळच फिरण्याचा प्लान करा. मुंबईजवळील पुणे (Pune) हे शहर तुमचा लाँग वीकेंड घालवण्यासाठी बेस्ट राहील. यंदा पुण्याला गेल्यावर नवीन ठिकाणे फिरा.
पुण्यातील कामशेत पर्यटकांचे आकर्षण आहे. तुम्ही येथे तुमच्या मित्रांसोबत पॅराग्लायडिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. तसेच कामशेत साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची देखील उत्तम सोय आहे. कामशेत जवळ अनेक मंदिरे देखील पाहायला मिळतात.
पुणे शहराच्या मध्यभागी लाल महल वसलेला आहे. ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणीचा काळ घालवला आहे. शाहिस्तेखानाची बोटे शिवाजी महाराजांनी लाल महलात छाटली होती. आजही हा लाल महल मजबूत उभा आहे.
पुण्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पर्वती होय. पुणे शहराच्या आग्नेय दिशेस पर्वती टेकडी आहे. पर्वतीवरून पुण्याचे अद्भुत सौंदर्य पाहाता येते. पर्वती समुद्रसपाटीपासून 2,100 फूट उंच आहे. या टेकडीवर पार्वती मंदिर आहे. हिवाळ्यात तुम्हाला पर्वतीवर धुक्याची चादर पाहायला मिळेल.
पुण्यातील लेण्याद्री येथे अष्टविनायकांपैकी सहावा गणपती आहे. लेण्याद्रीला गणेश पहार लेणी असे देखील बोले जाते. लेण्याद्री वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. लेण्याद्रीला भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
पुण्यातील स्वारगेटजवळ सारसबाग आहे. लहान मुलांसाठी फिरायला हे मस्त ठिकाण आहे. रंगीबेरंगी फुले येथे पाहायला मिळतात. सारसबागमध्ये सुंदर तळे देखील आहे.
थंडीची चाहूल लागल्यावर पुण्याची ही लाँग वीकेंड ट्रीप तुम्हाला आनंद देईल आणि तुमचा मूड देखील फ्रेश होईल. पुण्यातील ही सर्व ठिकाणे फोटोशूटसाठी बेस्ट आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.