Yavatmal Tourism Places: सुंदर दृश्ये अन् मनमोहित करणारा निसर्ग यवतमाळमधील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Best Places In Yavatmal: महाराष्ट्रातील यवतमाळ शहर पर्यटकांना फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. यवतमाळ शहर त्याच्या सुंदर दृश्यांमुळे पर्यटकांना आकर्षित करत असते. महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ शहर फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
yavatmal
yavatmal goggle
Published On

महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ शहर त्याच्या मनमोहक दृश्यामुळे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असते. समुद्रसपाटीपासून यवतमाळ शहर सुमारे १४६० फूट उंचीवर वसलेले आहे. पर्यटकांना फिरण्यासाठी यवतमाळ शहर उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ एक छोटे शहर आहे. या शहरात पर्यटकांना अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे.

पर्यटकांना यवतमाळमध्ये प्राचीन मंदिरे,निसर्गरम्य पिकनिक स्पॅाट,अभयारण्य यांसारख्या बऱ्याच गोष्टी अनुभवता येणार आहे. यवतमाळमध्ये पर्यटकांना सुंदर असे निसर्गाचे विलक्षण दृश्ये सुद्धा पाहता येणार आहे. जर तुम्ही सुद्धा सुट्टीत यवतमाळ शहराला भेट देणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी आहे. पर्यटक यवतमाळ शहराला भेट देण्यासाठी तिन्हीं मार्गानीं जाऊ शकता. याबरोबर यवतमाळ शहराला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते जानेवारी आहे. पर्यटकांचा यवतमाळ शहरातील अनुभव खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

yavatmal
Buldhana Tourism : खळखळून वाहणाऱ्या नद्या अन् सुंदर मंदिरांनी बहरलेला बुलढाणा

चिंतामणी मंदिर

यवतमाळमधील श्री चिंतामणी मंदिर पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे एक हिंदू मंदिर असून भाविकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. चिंतामणी मंदिर एक धार्मिक मंदिर असून या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या मंदिरात पर्यटकांना भगवान गणेशाची सुंदर मूर्ती पाहायला मिळेल. त्याचबरोबर पर्यटकांना चिंतामणी मंदिराचे सुंदर दृश्य अनुभवता येणार आहे.

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या वन्यजीव अभयारण्याला भेट देण्यासाठी पर्यटक नेहमी येत असतात. टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना बायसन, काळवीट, निळा बैल, हरिण, वाघ, रानडुक्कर असे विविध प्रकारचे प्राणि पाहायला मिळतील. एक दिवसाच्या पिकनिकसाठी टिपेश्वर अभयारण्य योग्य ठिकाण आहे. हे अभयारण्य १५०.६३ किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. जर तुम्ही सुद्धा यवतमाळ शहराला भेट देणार असाल तर, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला नक्की भेट द्या.

yavatmal
Kolhapur Tourism : कोल्हापुरला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या

पोस्टल ग्राउंड

यवतमाळ शहरातील पोस्टल ग्राउंड हे इतिहास आणि संस्कृतीने नटलेले एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे पोस्टल ग्राउंड त्याच्या सुंदर निसर्गरम्य दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. यवतमाळमधील हे पोस्टल ग्राउंड स्थानिक मेळावे, क्रीडा उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे ठिकाण म्हणून काम करते. याबरोबर पोस्टल ग्राउंडचा इतिहास खूप समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. पोस्टल ग्राउंडचा परिसर ब्रिटिश काळात औद्योगिक केंद्र म्हणून वापरला जात होता. पर्यटकांना भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

पैनगंगा नदी

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात पर्यटकांना पैनगंगा नदी पाहायला मिळेल. पैनगंगा नदीची लांबी सुमारे ३३२ किलोमीटर आहे. ही नदी तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत असते. याबरोबर पैनगंगा नदी महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाची नदी आहे. पैनगंगा नदी तिच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. या नदीला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी ही पैनगंगा नदी उत्तम ठिकाण आहे. या नदीवर पर्यटकांना अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे पाहायला मिळतील.

yavatmal
Chiplun Tourism Places: हिरवी झाडी अन् गडकिल्ले, चिपळूणमधील ही ठिकाणे तुम्हाला करतील मनमोहित

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com