Tomato Juice for Liver saam tv
लाईफस्टाईल

Tomato Juice for Liver: टोमॅटोच्या ज्यूसने लिव्हरवर जमा झालेली चरबी झटक्यात वितळेल; फक्त या वेळी प्या रस

Tomato Juice For Liver Detox: लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस फायदेशीर ठरतो का? टोमॅटोमधील लाइकोपीन, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे संभाव्य फायदे जाणून घ्या. फॅटी लिव्हर, पचनक्रिया आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी टोमॅटोचा ज्यूस कसा प्यावा, हे जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सध्या लिव्हरशी संबंधित समस्या वाढताना दिसतायत. लिव्हर हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकणं, अन्न पचवण्यास मदत करणं आणि शरीरातील घाण बाहेर काढण्याचं काम लिव्हर करते. पण लिव्हरमध्ये घाण साचू लागल्यास त्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी टोमॅटोचा ज्यूस लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

टोमॅटोचा ज्यूस लिव्हरसाठी कसा फायदेशीर?

टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे घटक लिव्हर निरोगी ठेवण्यास आणि त्याचं काम सुरळीत सुरू राहण्यास मदत करतात. टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने लिव्हरला कोणते फायदे मिळू शकतात, ते जाणून घेऊया.

शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत

टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. हे घटक लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे टोमॅटोमध्ये ग्लुटाथिओन नावाचे घटक असतात. हे शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे लिव्हरचं काम चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते.

फॅटी लिव्हरचा धोका

सध्या फॅटी लिव्हरची समस्या वाढतेय. जास्त प्रमाणात मद्यपान करणं, जंक फूड खाणं आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे ही समस्या उद्भवू शकते. टोमॅटोच्या ज्यूसमुळे लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यापासून बचाव होण्यास मदत मिळते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे लिव्हरमधील सूज कमी करण्यास मदत करते.

लिव्हरसाठी ठरतो फायदेशीर

लिव्हरचं काम व्यवस्थित सुरू राहण्यासाठी त्यातील एन्झाइम्सची पातळी योग्य असणं गरजेचं आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं. हे घटक लिव्हरमधील एन्झाइम्स एक्टिव्ह ठेवण्यास आणि शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला मदत करतात.

पचनक्रिया सुधारण्यास मदत

लिव्हर निरोगी असेल तर पचनक्रियाही व्यवस्थित राहण्यास मदत होते. टोमॅटोच्या ज्यूसमध्ये फायबर असतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते.

औषधांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत

जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा औषधांचं सेवन करतात त्यांच्यासाठी टोमॅटोचा ज्यूस फायदेशीर ठरू शकतो. टोमॅटोमधील घटक लिव्हरच्या पेशींची दुरुस्ती होण्यास आणि त्यांचं नुकसान टाळण्यास मदत करतात.

टोमॅटोचा ज्यूस कसा प्यावा?

  • टोमॅटोच्या ज्यूसचा आहारात समावेश करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  • सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास ताज्या टोमॅटोचा ज्यूस पिऊ शकता.

  • टोमॅटोच्या ज्यूसमध्ये चवीनुसार काळं मीठ आणि लिंबाचा रस घालू शकता.

  • ज्यूस बनवण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि ताज्या टोमॅटोचा वापर करा.

  • बाजारात मिळणारे प्रिझर्व्हेटिव्ह असलेले पॅकबंद ज्यूस पिणं टाळा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैष्णवी हगवणे प्रकरणात लता, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना सशर्त जामीन

Gold Rate Today : धनत्रयोदशीला १ तोळा सोन्याची किंमत किती? दर वाढले की घसरले? वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

Firecracker Insurance : फक्त १० रुपयांत इन्शुरन्स! दिवाळीत फटाक्यांमुळे अपघात झाल्यास मिळणार आर्थिक मदत

ग्रामपंचायतीत प्रशासकीय भूकंप! २ ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित; ग्रामपंचायतीचे दप्तर अद्ययावत न ठेवल्याचा ठपका

'रडीचा डाव' खेळणं बंद करा! गोकुळवरून राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; म्हणाले, "आता विरोधकांचा काळ..."

SCROLL FOR NEXT