Monday Shiva remedies money marriage problems saam tv
लाईफस्टाईल

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Shravan first day remedies: भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक पवित्र उपाय आणि विधी केले जातात. श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि या महिन्यात त्यांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

श्रावण महिना म्हणजे संपूर्णतः भगवान शंकराला अर्पण केलेला महिना असतो. या महिन्यात दररोज भगवान शिवाची भक्ती केल्याने साधकाला विशेष लाभ होतो, असं मानलं जातं. शिव म्हणजे संहाराचे देव पण त्याचबरोबर तेच सृष्टीचं रक्षण करणारेही आहेत. असं म्हटलं जातं ज्याच्यावर महादेवाची कृपा असते त्याच्या आयुष्यात कोणतीही नकारात्मक शक्ती टिकून राहत नाही.

आजपासून श्रावणाची सुरुवात

वैदिक पंचांगानुसार, आषाढ पौर्णिमेनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये, श्रावण महिना ११ जुलैपासून सुरू होत असून ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. धार्मिक परंपरेनुसार, या महिन्याच्या पहिल्याच दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास भक्ताला भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते.

श्रावणातील पहिल्या दिवशीचे प्रभावी उपाय

शिव-पार्वतीची एकत्र पूजा करा

श्रावणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची एकत्र पूजा करा. यावेळी शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल अर्पण करा आणि त्यानंतर कच्चं दूध वाहा. ही पूजा अत्यंत शुभ मानण्यात येते. या वेळी गरीबांना मिठाई दान केल्यास घरात आनंद आणि भरभराट येते आणि देव प्रसन्न होतात.

पंचामृताने शिवाभिषेक करा

शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप आणि साखर यांनी बनवलेल्या पंचामृताने अभिषेक करणं फारच फलदायी मानलं जातं. या अभिषेकामुळे घरामध्ये सौख्य, प्रेम आणि समाधान नांदतं. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं.

त्रास दूर करायचा असेल तर 'ही' पूजा करा

ज्यांच्या जीवनात वारंवार संकटं येतात त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे श्रावणातील पहिल्या शुक्रवारी भगवान शिवाची विशेष पूजा करावी. शिवलिंगावर बेलपत्र, धोत्रा, भांग आणि फुलं अर्पण करा. प्रत्येक वस्तु अर्पण करताना ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करत राहा.

प्रार्थना करा

पूजेनंतर शिवलिंगासमोर बसून आपल्या मनातील चुका स्वीकारून त्यांची क्षमा मागा. महादेव हे सहज प्रसन्न होणारे देव मानले जातात. भक्तीभावाने केलेल्या प्रार्थनेमुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्यावरील दुःख-दारिद्र्य दूर करतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee Use For Hair: केसांना तूप लावण्याचे अद्भुत फायदे जाणून घ्या

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

SCROLL FOR NEXT