Diwali Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Recipe : सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, 'या' प्रकारे बनवा दुधीची खीर

सण-उत्सवात एक वेगळेच वातावरण असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diwali Recipe 2022 : सण-उत्सवात एक वेगळेच वातावरण असते. लोक घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात, विशेषतः मिठाई. मिठाई हा भारताच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याला सणात विशेष स्थान आहे. दिवाळीचा सण मिठाईशिवाय अपूर्ण असल्याचे म्हटले जाते कारण या दिवशी लोक एकमेकांना मिठाई भेट देतात आणि घरात आलेल्या पाहुण्यांना खाऊ घालतात. त्यामुळे सण (Festival) जवळ येताच बाजारपेठेत मिठाईचे स्टॉल्स थाटण्यास सुरुवात होते.

मात्र भेसळीच्या भीतीने महिला बाहेरून मिठाई विकत घेण्याऐवजी घरीच बनवण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही घरी मिठाई बनवण्याचा विचार करत असाल तर मग उशीर का करताय, जाणून घेऊया मिठाईच्या पाककृती. (Sugar)

साहित्य -

२ लिटर - दूध, १०० ग्रॅम - दुधी (किसलेले), २०० ग्रॅम - साखर, १ वाटी - काजू, चिमूटभर- वेलची पावडर, ६-७ - बदाम (गार्निशिंगसाठी)

दुधीची खीर कशी बनवायची -

१. दुधीची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधीला धुवून किसून घ्या आणि उकळायला ठेवा.

२. आता एका भांड्यात दूध टाकून भांडे गॅसवर ठेवा. नंतर थोडा वेळ शिजू द्या. ( गुलाब जामुन कसा बनवायचा )

३. नंतर त्यात किसलेला दुधी घाला, पण लक्षात ठेवा की दुधी जास्त चिकट आणि घट्ट नसावी कारण ती तुमच्या खीरची चव खराब करू शकते.

४. दुधीचा कच्चापणा निघेपर्यंत तुम्ही खीर शिजवा आणि नंतर ते चांगले मिसळा, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही दूध घातल्यानंतर तुम्ही सतत ढवळत राहा.

५. दूध थोडं घट्ट व्हायला लागलं की त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून साधारण १० मिनिटे चांगले शिजवा.

६. जेव्हा हे मिश्रण खीरचे रूप धारण करू लागते, तेव्हा तुम्ही ते आचेवरून उतरवा आणि थंड होण्यासाठी ठेवा. आता एका प्लेटमध्ये खीर काढा आणि वर ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT