Tirupati Balaji Temple Tour Guide Saam tv
लाईफस्टाईल

Tirupati Balaji Travel Guide: तिरुपती बालाजीचं दर्शन करण्याची इच्छा आहे? वेळेपासून ते तिकीटापर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

Tirupati Darshan Time and Ticket Booking Details in Marathi: भारतात मंदिरांची संख्या खूप आहे. त्यातील काही मंदिर खूप प्रसिद्ध आहेत. तिरुपती बालाजी त्यापैकीच एक आहे. या मंदिराविषयी काही विशेष माहिती जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

Tirupati Balaji Darshan Guide:

भारतात मंदिरांची संख्या खूप आहे. त्यातील काही मंदिर खूप प्रसिद्ध आहेत. तिरुपती बालाजी त्यापैकीच एक आहे. या मंदिराविषयी काही विशेष माहिती जाणून घेऊयात. (Latest Marathi News Update)

आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती मंदिर हे प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. मंदिराशी निगडीत माहितीची लोकांमध्ये चर्चा होते. तिरुपती बालाजी मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक मंदिर मानलं जातं. या मंदिरात जगभरातील लोक हे दर्शनासाठी येतात. या मंदिराला भेट द्यायचा विचार करत असाल तर तिकीट, दर्शनाची वेळ याविषयी माहिती जाणून घेऊयात.

मंदिरात जाण्याची वेळ (Time To Visit Tirupati Balaji Temple)

तिरुपती बालाजी मंदिरात वर्षभरात काही दिवस सोडले तर पूर्ण वर्ष तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी खुलं असतं. या मंदिरात सामान्य दर्शनाचा वेळ ही सकाळी ३ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत असते. त्यानंतर दुपारी २.३० ते रात्री ९.३० पर्यंत वेळ असते. शुक्रवारी आणि शनिवारी हे मंदिर २४ तास खुलं असतं.

तिकीटाचा दर (VIP Ticket Rate For Tirupati Balaji Temple)

तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानुसार, मंदिरात व्हिआयपी दर्शनासाठी ३०० रुपये मोजावे लागतात. तर सामान्य तिकीट दर हे ५० रुपये आहेत. दरम्यान, तिरुपती मंदिर खूपच प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिरातील गर्भगृहात मूर्तीसमोर मातीचा दिवा ठेवण्यात आला आहे.

तिरुपती बालाजी मंदिराची संपत्ती (Tirupati Balaji Temple Wealth)

मीडिया रिपोर्टनुसार, तिरुपती बालाजी देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची एकूण संपत्तीची माहिती समोर आली आहे. या मंदिराची राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याची माहिती मिळत आहे. या मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी आहे. या मंदिरात चांदीपासून ते मौल्यवान दगड, नाणी दान केल्या जातात. त्याचबरबोर कंपनीचे शेअर्स आणि मालमत्ता यासारख्या वस्तूही येथे दान केल्या जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT