Hair Falls Tips Saam Tv
लाईफस्टाईल

How To Control Hair Fall: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागले आहात ? केसांची वाढही थांबली आहे ? हे तीन होममेड ऑइल ट्राय करा

How To Stop Hair Falls : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व प्रदूषणांमुळे आपली केस गळती होते असे अनेकदा सांगितले जाते.

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व प्रदूषणांमुळे आपली केस गळती होते असे अनेकदा सांगितले जाते. परंतु, त्याचे सर्वात मोठे कारण आहे ते केसांची नीटशी काळजी न घेणे.

केसांना (Hair) पुरेशा प्रमाणात पोषकतत्व न मिळाल्यास केसांची वाढ खुटते. अनेक महागड्या उत्पादनांच्या वापरांमुळे,सतत बदलेल्या शॉम्पूमुळे केस गळती सुरु होते. लहानपणी आई केसांना पुरेशा प्रमाणात तेल लावायची त्यामुळे केस अधिक दाट व्हायचे. परंतु, सध्या खाण्यापिण्याच्या सवयी व धूळ-मातीमुळे आपल्या केस गळतीच्या (Falls) समस्या उद्भवतात. आम्ही आज तुम्हाला काही घरगुती हेअर ऑइल सांगणार आहोत ज्याचा वापर करुन आपण केस गळती रोखू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

1. आवळा तेल

  • मूठभर वाळलेला आवळा

  • 100 मिली नारळ तेल

कसे बनवाल ?

  • आवळ्याचे तेल (Oil) तयार करण्यासाठी आवळा घेऊन खोबरेल तेलात मिसळा व काहीवेळा नंतर बारीक वाटून घ्या.

  • यानंतर हे तयार तेल हवाबंद काचेच्या बाटलीत साठवा.

  • ही बाटली साधारण 15 दिवस उन्हात ठेवा.

  • नंतर तेल गाळून नियमितपणे केसांना लावा

2. बदाम तेल

  • 1 टेबलस्पून बदाम तेल

  • 1 टेबलस्पून जोजोबा तेल

  • 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

  • 4 थेंब रोझमेरी तेल

कसे बनवाल ?

  • बदामाचे तेल तयार करण्यासाठी, सर्व साहित्य एकत्र मिसळा.

  • आता हे तयार तेल काचेच्या बाटलीत भरा.

  • केस धुण्यापूर्वी एक रात्री केसांना लावा.

3. कढीपत्ता तेल

  • 3 चमचे नारळ तेल

  • मूठभर कढीपत्ता

कसे बनवाल ?

  • कढीपत्त्याचे तेल बनवण्यासाठी प्रथम खोबरेल तेल घ्या.

  • आता त्यात मूठभर कढीपत्ता घाला.

  • आता हे तेल काळे होईपर्यंत एका भांड्यात गरम करा.

  • यानंतर तेल थंड झाल्यानंतर बाटलीत भरा.

  • तुमचे घरगुती केसांचे तेल तयार आहे. वापरण्यापूर्वी ते थोडे कोमट करा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मुंबादेवीतून काँग्रेसचे अमिन पटेल आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT