Hair Falls Problem : उन्हाळ्यात केसांच्या अधिक समस्या उद्भवतात. या ऋतूमध्ये घामामुळे केस अधिक ओले होतात. ज्यामुळे ते कमकुवत होतात. अशावेळी केसांची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.
केस (Hair) जाड आणि मुलायम बनवण्यासाठी अनेकदा आपण महागडी उत्पादने वापरतो, ज्यामुळे आपले केस खराब होतात. केसांची काळजी (Care) घेण्यासाठी आपण काही नैसर्गिक गोष्टींचा समावेश करूनही तुम्ही ते निरोगी ठेवू शकता. चला जाणून घेऊया, केस निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय (Home remedies).
1. कांद्याचा रस
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. याचा नियमित वापर केल्याने केसांना खूप फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, सोडियम, पोटॅशियम आणि इतर अनेक आवश्यक घटक आढळतात, ज्यामुळे केस मजबूत होतात.
2. मेथी दाणे
मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. यासाठी मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बारीक करा. आता ते केसांना लावा, साधारण ३० मिनिटांनी पाण्याने धुवा.
3. हिना मेहंदी
केसांच्या मजबुतीसाठी तुम्ही मेहंदीचा मास्क देखील वापरू शकता. यासाठी मेहंदी पावडरमध्ये शिककाई, आवळा पावडर मिसळून पॅक बनवता येतो. याच्या वापराने केसांची मुळे मजबूत होतात.
4. कोरफड जेल
व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फॉलिक अॅसिड आणि इतर अनेक घटक अॅलोवेरा जेलमध्ये आढळतात, जे केसांसाठी फायदेशीर आहेत. याचा वापर केल्याने केस निरोगी होऊ शकतात. त्यात कंडिशनिंग एजंट असतात, जे केसांना नुकसान होण्यापासून वाचवतात. तुम्ही दररोज रात्री कोरफडीच्या जेलने स्कॅल्पला मसाज करा आणि सकाळी धुवा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.