नवीन वर्ष सुरु होताना आपण अनेक ठराव घेतो. त्यात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तणाव, चिंता आणि मानसिक अस्थिरतेमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच, पुढील वर्षी मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी काही प्रभावी सवयी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
दररोज ध्यान करण्याची सवय लावा. ध्यानामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो. योगामध्ये काही ताणतणाव कमी करणाऱ्या आसनांचा समावेश करा, जसे की शवासन, बालासन, व प्राणायाम.
पर्याप्त आणि शांत झोप मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. दररोज ७-८ तास झोपण्याचा प्रयत्न करा. झोपण्याआधी मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा.
सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक ताणतणाव वाढवू शकतो. दिवसातून ठराविक वेळ सोशल मीडियासाठी ठेवा आणि उर्वरित वेळात प्रत्यक्ष संवादावर भर द्या.
संतुलित आहारामुळे मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. फळे, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि जंक फूड टाळा.
सकारात्मक विचारसरणी आत्मसात केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा आणि स्वतःबद्दल चांगल्या भावना जोपासा.
तणाव आणि चिंता वाढल्यास त्वरित मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्या. मानसिक आरोग्याबाबत मदत घेणे लाजिरवाणे नाही, तर ते उत्तम आरोग्याची दिशा आहे.
तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवा, जसे की पुस्तक वाचन, संगीत ऐकणे, चित्रकला, किंवा गार्डनिंग. छंदांमुळे तणाव कमी होतो आणि मनाला आनंद मिळतो.
आपल्या भावना आणि समस्या जवळच्या लोकांशी मोकळेपणाने शेअर करा. संवादामुळे मन हलके होते आणि तणाव कमी होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.