Healthy Kidneys Saam TV
लाईफस्टाईल

Healthy Kidneys : आयुष्यात किडनी कधीच फेल होणार नाही; रोजच्या नाश्त्यात खा 'हे' पदार्थ

Healthy Kidneys Tips : अनेक व्यक्ती सकाळी काही न खाता घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांची चिडचिड वाढते. शिवाय त्यांना किडनीशी संबंधित कालांतराने काही समस्या जानवतात.

Ruchika Jadhav

सकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वजण हलका-फुलका आहार करतात. नाश्ताकरून घराबाहेर पडल्याने सकाळी सकळी डोकं शांत राहतं. अनेक व्यक्ती सकाळी काही न खाता घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांची चिडचिड वाढते. शिवाय त्यांना किडनीशी संबंधित कालांतराने काही समस्या जानवतात. आता तुम्हाला देखील किडनीच्या समस्यांपासूनस दूर रहायचं असेल तर नाश्त्याला हे पदार्थ खाण्यास सुरुवात करा.

मीठ कमी करा

अनेक व्यक्ती सकाळच्या नाश्त्यात ब्रेट बटर खातात. मात्र बटरची चव खारट असते. तसेच काही फळं खात असल्यास व्यक्ती त्याची चव वाढवण्यासाठी त्यावर मीठ टाकतात. त्याने पदार्थाची चव वाढत असली तरी हायपरटेंशनच्या समस्या आणखी वाढतात. त्यामुळे अनेक व्यक्तींना फार कमी वयात किडनी फेल होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. आहारात रोजचे फक्त २३०० मिग्रा सोडिअम असावे.

हायड्रेशनयुक्त पदार्थ आणि फळं

किडनीचा त्रास उद्भवूनये यासाठी शरीरात हायड्रेशन असणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसभर जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. पाणी हे एकच माध्यम आहे जे आपल्या किडनीपर्यंत सर्व पोषकतत्व रोहचवते. जर तुम्ही पाणी जास्त प्यायले नाही तर विविध फळांच्या ज्यूसचं सेवन केलं पाहिजे.

ओट्स

नाश्त्यामध्ये ओट्सचं प्रमाण वाढवा. ओट्स पचन्यासाठी फार हलके असतात. त्यामुळे तुम्ही आहारात मसाला ओट्सपासून अन्य विविध ओट्सचा समावेश करू शकता. ओट्स खाल्ल्याने किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींना देखील जास्त समस्या निर्माण होणार नाहीत.

दूध

दूधातील कॅल्शीअम विविध आजारांवर मात करते. आपल्या शरीराला रोगांवर मात करण्यासाठी ताकत देते. त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये देखील एक ग्लास दूध पिऊ शकता.

कॉफी

कॉफीमध्ये कॅफेन असतं त्याने आपल्या झोप येत नाही. त्यासह कॅफनचा आणखी एक उपयोग म्हणजे कॅफेनमुळे आपली किडनी सुरक्षीत राहते. क्रॉनिक किडनी सारख्या समस्या देखील कमी होतात. असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.

टीप : ही फक्त सामान्या माहिती आहे. साम टीव्ही किडनीवरील उपायांचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Live Update: नांदगावला धुवाधार पाऊस लेंडी नदीला पुर .रेल्वे अंडरपास 3 फूट पाण्याखाली

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT