Uses Of Egg Shell Saam Tv
लाईफस्टाईल

Uses Of Egg Shell : अंडी उकडल्यानंतर टरफले फेकून देताय ? थांबा ! घरातील साफसफाईसाठी ठरेल उपयोगी

Benefits Of Egg Shell : अंड्यातून मिळणारे पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर आहेच पण त्याच्या सालीचा देखील आपल्याला फायदा होतो.

कोमल दामुद्रे

Cleaning Hacks : अंडी म्हटलं की, आपल्या डोक्यात येतं ते उकडलेलं अंडी, भूर्जी, ऑमलेट किंवा त्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ. परंतु, अनेकदा आपण अंड्याचे पदार्थ बनवल्यानंतर त्याचे टरफले फेकून देतो.

अंड्यातून (Eggs) मिळणारे पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर आहेच पण त्याच्या सालीचा देखील आपल्याला फायदा होतो. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, त्याच्या टरफल्याचा वापर घर साफ (Clean) करण्यासाठी कसा करणार ते जाणून घेऊया.

1. मातीला सुपीक बनवण्यासाठी

अंड्याच्या टरफल्यामध्ये कॅल्शियम असते. अशा स्थितीत ते कुस्करून जमिनीत मिसळल्यास सुपीकता वाढते. हे विशेषतः टोमॅटो आणि मिरपूड सारख्या भाज्यांसाठी उपयुक्त आहे, जे फळे लावल्याबरोबर त्यांना पुरेसा पोषक आहार देतात

2. कीटकांपासून वनस्पतींचे संरक्षण करते

अंड्याचे कवच हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतात. त्याच्या मदतीने, आपण कीड्यांपासून वनस्पती आणि बाग कीटकांचे संरक्षण करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त अंडी वाळल्यावर बारीक करून पावडर बनवावी लागेल आणि बागेत शिंपडावी लागेल. असे केल्याने सर्व कीटक काही वेळात नष्ट होतील.

3. बाटल्या आणि फुलदाण्या स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त

लांब फुलदाण्या आणि बाटल्या आत स्वच्छ करणे खूप कठीण असते. या प्रकरणात, अंड्याचे टरफले यामध्ये उपयुक्त ठरू शकतात. यासाठी अंड्याची टरफले पाणी किंवा व्हिनेगरने फोडून मिश्रण तयार करा. आता ते बाटलीत ठेवा आणि थोडा वेळ चांगले हलवा. असे केल्याने तळाशी साचलेली सर्व घाण साफ होते व नंतर साबणाच्या पाण्याने स्वच्छ धूवा ज्यामुळे वास येणार नाही.

4. जळलेली भांडी

अनेकदा जेवण बनवताना किंवा चहा अधिक उकळल्यानंतर भांडी खालून जळतात. जळालेली भांडी स्वच्छ करताना नाकी नऊ येतात अशावेळी कितीही घासले तरी ते लवकर साफ होत नाही. त्यासाठी साबणाच्या पाण्यात टरफले मिसळा आणि स्क्रबिंग करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Ban: भारतातही १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी करावी का? नेटकऱ्यांचं मत काय? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: थार, फॉर्चूनर सारख्या महागडा स्पोर्ट कारवर वाहतूक पोलिसांची कारवाई

Dhurandhar: 'असे चित्रपट कधी कधी...'; धुरंधर चित्रपटाच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात, भाविकांच्या पीकअपला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Detox Drink : सकाळी उठल्यावर प्या हे हेल्दी कोथिंबीर लिंबूचे डिटॉक्स ड्रिंक

SCROLL FOR NEXT