Shani Purnima 2025 saam tv
लाईफस्टाईल

Shani Purnima 2025: यंदाच्या वर्षीची शनी पौर्णिमा ठरणार खास; वाचा शुभ मुहूर्त आणि पुजेची विधी

Shani Purnima shubh muhurat: यंदाची शनि पौर्णिमा विशेष महत्त्वाची आहे, कारण या दिवशी पौर्णिमा तिथी शनिवारी येत आहे, ज्यामुळे त्याचे महत्त्व कैक पटीने वाढते. शनि पौर्णिमा ही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

  • 2025 मध्ये शनि पौर्णिमा शनिवारी येणार आहे.

  • शनि आणि चंद्रदेवांची पूजा फलदायी मानली जाते.

  • पूजेसाठी सकाळी 6 ते 8:30 चा शुभ मुहूर्त आहे.

हिंदू पंचांगानुसार, आषाढ आणि पौष महिन्यातील पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र 2025 मधील शनि पौर्णिमा खास ठरणार आहे. यावर्षी पौर्णिमेच्या दिवशी शनिवारचा संयोग होत असल्याने शनिदेवांची विशेष कृपा मिळवण्याची उत्तम संधी लाभणार आहे.

या दिवशी शनिदेव आणि चंद्रदेवांची पूजा केल्यास जीवनातील अडचणी कमी होतात. त्याचप्रमाणे मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि अडथळ्यांवर उपाय मिळतो, असं मानलं जातं. आजच्या दिवशी शुभ मुहूर्त कधी आहे आणि पुजेची पद्धत कशी असावी याची माहिती जाणून घेऊया.

शनि पौर्णिमा 2025 पूजा मुहूर्त

  • पौर्णिमा तिथीची सुरुवात- ८ ऑगस्ट २०२५, शुक्रवार, सकाळी १०:१२

  • पौर्णिमा तिथीची समाप्ती- ९ ऑगस्ट २०२५, शनिवार, सकाळी ०८:५६

  • शनि पूजनाचा शुभ वेळ- ९ ऑगस्ट २०२५, शनिवार, सकाळी ०६:०० ते ०८:३०

  • चंद्रोदय वेळ- ९ ऑगस्ट २०२५, संध्याकाळी ०७:१०

शनि पौर्णिमा पूजा पद्धत

आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर काळी उडीद डाळ, काळे तीळ, निळ्या रंगाची फुले, लोखंडी खिळा आणि सरसोंचे तेल अर्पण करावे. याशिवाय पूजेच्या वेळी "ॐ शं शनैश्चराय नमः" हा मंत्र अखंड जपावा. चंद्रदेवांना अर्घ्य देताना गोड दूध आणि तांदूळ मिसळलेले पाणी वापरावं.

शनि पौर्णिमेचे खास उपाय

  • काळे तीळ आणि उडीद दान केल्याने शनि दोष आणि साडेसातीचे परिणाम कमी होतात.

  • गरीब आणि गरजू लोकांना काळे कपडे, जोडे-चप्पल आणि लोखंडी भांडी दान करणं शुभ मानलं जातं.

  • पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून ७ प्रदक्षिणा घालाव्यात, यामुळे कामातील अडथळे दूर होतात.

  • संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावून शनि स्तोत्र पठण करावं.

  • चंद्रदोष कमी करण्यासाठी रात्री चंद्रदेवांना दूध आणि साखर मिसळलेले पाणी अर्घ्य म्हणून अर्पण करावं.

शनि पौर्णिमा 2025 केव्हा आहे?

शनि पौर्णिमा 2025 च्या 9 ऑगस्ट रोजी, शनिवारी आहे. पौर्णिमा तिथी सकाळी 8:56 पर्यंत राहील.

शनि पौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे?

शनि पूजनाचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:00 ते 8:30 दरम्यान आहे.

शनिदेवांना कोणती वस्तू अर्पण करावी?

शनिदेवांना काळी उडीद डाळ, काळे तीळ, निळी फुले, सरसोंचे तेल आणि लोखंडी खिळा अर्पण करावा.

शनि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांना अर्घ्य कसा द्यावा?

चंद्रदेवांना गोड दूध आणि तांदूळ मिसळलेले पाणी किंवा साखर मिसळलेले पाणी अर्घ्य म्हणून अर्पण करावे.

शनि दोष आणि साडेसातीपासून मुक्तीसाठी कोणते उपाय फायदेशीर आहेत?

काळे तीळ आणि उडीद डाळ दान करणे, गरजूंना काळे कपडे, चप्पल आणि लोखंडी भांडी देणे आणि पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन 7 प्रदक्षिणा घेणे हे फायदेशीर उपाय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण हवाच! 100 वर्षांच्या बहिणीनं 104 वर्षांच्या लाडक्या भावाला बांधली राखी

Gajar Halwa: गाजर न किसता घरीच बनवा हलवा,सोपी आहे रेसिपी

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस आता धावणार नागपूर ते पुणे, पण कधीपासून? वाचा...

Hospital Fire: हॉस्पिटलमध्ये भीषण आग; खिडक्यांच्या काचा तोडून रुग्णांना काढलं बाहेर, घटनास्थळी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Maharashtra Live News Update: पुण्यातील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात

SCROLL FOR NEXT