Sabudana Side Effects Saam TV
लाईफस्टाईल

Sabudana Side Effects : 'या' व्यक्तींनी चुकूनही खाऊ नये साबुदाणा खिचडी; आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती

Ruchika Jadhav

सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत. नवरात्र असो अथवा अथवा अन्य कोणत्याही सणानिमित्त किंवा पुजेनिमित्त तुम्ही उपवास करत असाल तर साबुदाणा खिचडी हमखास बनवली जाते. साबुदाण्याचे वडे, टिक्की आणि गोड म्हणून खिर सुद्धा बनवली जाते. हे पदार्थ खाणे प्रत्येकाला आवडते. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही व्यक्ती उपवास नसताना सुद्धा साबुदाणे खातात.

उपवासात साबुदाणे खाणे चांगली गोष्ट आहे. मात्र सर्वच व्यक्तींनी याचे सेवन करू नये. साबुदाणा खिचडी काही ठरावीक व्यक्तींसाठी घातक ठरते. या खिचडीचे सेवन केल्याने आरोग्य सुधारण्याऐवजी आणखी बिघडतं. त्यामुळेच आज कोणत्या व्यक्तींनी साबुदाणा खावा आणि कोणी खाऊ नये याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

डायबेडिज

अनेरिकन डायबिटीज असोसिएशनच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खिचडीमध्ये असलेले कार्बोहायड्रेट शरीरातील साखर वाढवण्यास सुरूवात करतात. अशात जर तुम्ही आधीच डायबिटीजचे पेशंट असाल तर तुम्हाला साबुदाणे खाल्ल्याने आणखी जास्त त्रास होईल.

लठ्ठपणा

जर तुम्ही जाड आहात आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपवास करत असाल तर सावधान. उपवास करताना तुम्ही खिचडीचे सेवन केल्याने आरोग्यावर उलट परिणाम होतो. कारण साबुदाणामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट दोन्ही असते. त्यामुळे याचे सेवन करू नये. त्याने तुमचा लठ्ठपणा आणखी जास्त वाढेल.

थायरड

काही मुलींना वाढत्या वयात अचानक थायरड होतो. थायरड झाल्याने तेव्हा देखील साबुदाणा खाल्ल्याने वजन आणखी जास्त वाढण्यास सुरुवात होते. अशा व्यक्तींना सतत धाप लागणे, श्वास कोंडणे या समस्या सुद्धा जाणवतात.

पचनाच्या समस्या

आपल्या पोटाला अन्नाची गरज असते तशीच पोट साफ होण्याची सुद्धा गरज असते. अनेक व्यक्ती रोज जड पदार्थ खातात. बाहेरचे फास्ट फूड खाल्ल्याने ते लवकर पचत नाहीत. पचनासाठी खिचडी सुद्धा जड असते. खिचडी जड असल्याने तुम्ही याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Pune News : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; एक आरोपी अटकेत

Diet Sweet : चॉकलेट अन् साखरेला करा टाटा; डाएटमध्ये खाऊ शकता 'हे' गोड पदार्थ

Viral Video: याssssक्...रस्त्यावर भाजीपाला खरेदी करताय, थोडं थांबा; हा VIDEO पाहून प्रचंड राग येईलच, पण चिंताही वाढेल!

WTC Points Table: इंग्लंडकडून पाकिस्तानला बुक्कीत टेंगुळ! WTC Final च्या शर्यतीतून केलं बाहेर; फायनलमध्ये कोण भिडणार?

SCROLL FOR NEXT