Palmistry Saam tv
लाईफस्टाईल

Palmistry: तळहातावरील 'ही' चिन्हं आणतायत तुमच्या आयुष्यात वादळ; पाहा काय सांगतं हस्तरेशा शास्त्र!

Palmistry: हस्तरेषाशास्त्रावर अनेकांचा विश्वास असतो. आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा तसंच त्यांच्या आकाराचा आयुष्याशी नेमका काय अर्थ असतो, हे या शास्त्रातून समजतं.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये हस्तरेखा शास्त्राला फार महत्त्व देण्यात आलं आहे. अनेकवेळा तुमचा हात पाहून भविष्य सांगण्यात येतं. मुळात हस्तरेखा शास्त्रामध्ये अशा अनेक रेषा, चिन्हं आहेत ज्यापासून बनवलेले आकार स्पष्ट केलेत. या शास्त्रामध्ये तुमच्या हाताच्या रेषांचा अभ्यास करून भविष्याशी निगडीत गोष्टी समजू शकतात.

आपण आज हातावरील अशा रेषांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या करियरमध्ये येणाऱ्या समस्यांबाबत तुम्हाला माहिती मिळू शकणार आहे.

कोणाच्या आयुष्यात येऊ शकतात समस्या

हस्तरेखा शास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या हातावर सूर्याची रेखा छोटी असते आणि हृदय रेषा पहिल्यांदाच थांबलेली दिसून येते, अशा व्यक्तींना त्यांच्या करियरमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार, नोकरी मिळत नाही. याशिवाय अभ्यासात देखील मनाप्रमाणे यश मिळत नाही.

कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा

हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या हातावर सूर्य पर्वताच्या तीन किंवा चार रेषांवर आहे किंवा आपापसात एकमेंकाना छेद देत असेल तर अशांच्या करियरमध्येही फारशी चांगली प्रगती होत नाही. या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे कोणा व्यक्तीच्या हातात सूर्य रेषा अस्पष्ट असेल अशा व्यक्तींनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे.

कोण असतं लाभदायक?

तर्जनीच्या अगदी खालच्या बाजूला गुरु पर्वत असतो. हस्तरेषा शास्त्रामध्ये असं मानण्यात आलंय की, ज्या व्यक्तीच्या हातात गुरु पर्वत उभा असतो, अशा व्यक्ती भाग्यशाली असतात. मेडिकल आणि मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये या व्यक्तींना चांगली संधी मिळते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठरलं! सुनेत्रा पवारांच्या विरोधात हा बलाढ्य नेता उभा राहणार; उद्याचा अर्ज भरणार|VIDEO

Tea Side Effects In Summer: उन्हाळ्यात चहा पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : रायगडच्या महाडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर

Fridge storage dough: फ्रिजमध्ये मळून ठेवलेली कणीक किती दिवस वापरता येते?

Thane : ठाण्यात कैद्याचा पोलिसावर हल्ला, सर्वांसमोर कानाखाली मारली

SCROLL FOR NEXT